आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भरपावसात वाटली पुस्तके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - इयत्ता पहिली आणि दुसरीची पाठय़पुस्तके गुरुवारी भरपावसात शाळांमध्ये पोहोचवण्यात आली. शिक्षण विभागाकडून पुस्तके वाटपात दिरंगाई होत असल्याची पालकांची ओरड होती. याची दखल घेत धास्तावलेल्या प्रशासनाने भरपावसात पुस्तके उपलब्ध करून दिली.

जिल्हय़ातील सर्व शाळा सुरू होऊन एक महिना उलटूनदेखील इयत्ता पहिल्या आणि दुसर्‍या वर्गाची पाठय़पुस्तके विद्यार्थ्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी पुस्तकाविनाच शाळेत जात होते, तर शिक्षकांनाही पुस्तक कसे आहे, हे माहीत नव्हते.

शिक्षणाधिकारी मात्र, शाळांमध्ये पुस्तके पोहोचली, असा दावा करीत होते. अभ्यासक्रम बदलला म्हणून शिक्षकांचे प्रशिक्षण 23 जुलैपासून 2 ऑगस्टपर्यंत सुरूआहे. या प्रशिक्षण वर्गात शिकवणारे शिक्षक आणि शिकणारे शिक्षक या दोघांनी या बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके पाहिली नव्हती. केवळ मार्गदर्शिकेमधून प्रशिक्षणाचा खटाटोप सुरू होता. मात्र, पालकांची ओरड वाढल्याने शिक्षकांनी गुरुवारी भरपावसात शाळांना इयत्ता पहिली आणि दुसरीची पाठय़पुस्तके वाटण्यात आली आहेत.