आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जूने शहरातील सात वर्षीय मुलाचा शाॅक लागल्याने मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जूने शहरातील शिवाजीनगरमध्ये असलेल्या वाल्मिक चाैकात जावळे काढण्याच्या कार्यक्रमातच सात वर्षीय मुलाचा शाॅक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. साहिल विजू गाेहर असे त्या मुलाचे नाव अाहे.

वाल्मिक चाैकात साहिलच्या घरी त्याचा जावळे काढण्याचा कार्यक्रम सुरू हाेता. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजता अचानक दारात लावलेल्या हॅलाेजनच्या वायरमध्ये करंट अाला. साहिलचा त्या वायरला स्पर्श झाला. यामध्ये शाॅक लागून साहिल दूर फेकल्या गेला. त्यानंतर उपस्थित नातेवाइकांनी त्याला शहरातील अायकाॅन रुग्णालयात भरती केले. मात्र, उपचारादरम्यान रात्री १२ वाजता डाॅक्टरने त्याला मृत घाेषित केले. त्यानंतर रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी झाली हाेती. साहिलचे वडील विजू गाेहर हे महानगरपालिकेमध्ये कर्मचारी अाहेत. जावळे काढण्याच्या मंगलमय क्षणी अशी दु:खद घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...