आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brahmin Sabhana In Akola ,latest News In Divya Marathi

विज्ञान जीवनाचा अविभाज्य घटक- डॉ. संतोषकुमार कोरपे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- निरीक्षण वृत्तीची जोपासना केली, तर तुमच्यातला शास्त्रज्ञ नक्कीच यशस्वी होईल. विज्ञान हा सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे’, असे मत डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. येथील ब्राह्मन सभा शाळेत हा कार्यक्रम झाला.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 28 फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी विज्ञान क्षेत्रातील प्रा. डॉ. मुसद्दिक खान यांचा ब्राrाण सभेचे अध्यक्ष अविनाश देव यांच्या हस्ते सत्कार झाला. या सत्काराला उत्तर देताना डॉ. खान म्हणाले की, विज्ञानाने जे दिले त्यातील नेमके काय घ्यावयाचे हे ठरवणे गरजेचे आहे. तसेच विज्ञान तंत्रज्ञान वापरावयाची र्मयादा हवी, असेही ते म्हणाले. या प्रसंगी अविनाश देव यांनी विद्यार्थ्यांना अंधर्शद्धेवर विश्वास ठेवू नये, असा संदेश दिला. या कार्यक्रमात रामप्रसाद राखोंडे याने डॉ. सी. व्ही. रमण यांच्या शोधाविषयी माहिती दिली. अर्चित हिंगे याने डॉ. रघुनाथ माशेलकरांविषयी सांगितले, तर शिवानी मसने हिने शोध कसा लागतो, याची माहिती दिली.
विज्ञान दिनानिमित्ताने आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण या वेळी केले. सायन्स फनफेअर 2014 अंतर्गत इंटरस्कूल सायंटिफिक टॉइज कॉम्पिटिशन विद्यार्थ्यांकरिता आयोजित केली होती. या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे डॉ. संतोषकुमार कोरपे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. प्रथम पारितोषिक प्रथमेश जोशी व मंदार चतुरकर यांनी पटकावले, तर ऋतिका शेगोकार व समीक्षा खुपसे यांनाही पारितोषिक देत गौरवले. तृतीय पारितोषिक शिवम् राठी व ऋषिकेश झगडे यांनी पटकावले. उत्तेजनार्थ पुरस्कार आदित्य राऊत व रावज्योतसिंग आनंदला तसेच राम महाजनला देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण अर्चना पंडित व प्रांजली गहूकर यांनी केले. या स्पर्धेत अकोल्यातील 15 शाळांनी सहभाग नोंदवला होता.
विज्ञान दिनानिमित्त ब्राह्मन सभा व कुतूहल संस्कार केंद्रांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित स्पर्धेत देवल गावंडे, आदित्य टाले व साक्षी मंत्री या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना पारितोषिक देण्यात आले., श्वेता टावरी, हर्षल कुळकर्णी, कार्तिक कुळकर्णी यांनाही गौरवण्यात आले. कुणाल देठे, आकांक्षा मंत्री, राम घोंगडे या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. गायत्री मारावार, रोशनी टाले, ऋषिकेश जोशी, मयूर धनोकार व अर्णव रुपदे या विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त गुण मिळवल्याने त्यांना गौरवण्यात आले. सूत्रसंचालन वृषाली खरे यांनी केले. डॉ. नितीन ओक, सुहास उदापूरकर, अनघा देव, आनंद कुळकर्णी, डॉ. पद्मावती कोरपे पालक वर्ग व मुख्याध्यापिका शोभा अग्रवाल शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.