आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रॉडगेजसाठी खासदार भावना गवळींचे रेल्वेमंत्र्यांना साकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घाटंजी - यवतमाळ -मूर्तिजापूर शकुंतला रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करावे आणि वर्धा-यवतमाळ -नांदेड रेल्वे मार्गासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून कामाची गती वाढवावी, अशी मागणी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी आता प्रयत्न सुरू केले असून, दिल्लीत मोदींचे सरकार सत्तारूढ असल्याने यवतमाळकरांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.

वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाला 2008-09 मध्येच मान्यता मिळाली आहे. पुरेशी आर्थिक तरतूद नसल्याने कासवगतीने काम सुरू आहे. गेल्या 5 वर्षांत केवळ 15 टक्के काम झाले आहे.

यवतमाळ हा आदिवासीबहुल व मागास जिल्हा असून, शेतकºयांच्या आत्महत्यांनी चर्चेत राहिला आहे. यवतमाळच्या औद्योगिक वसाहतीत रेमंड हा एकमेव उद्योग वगळता जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नाही. दळणवळणाची पुरेशी साधने नसल्याने उद्योगपती यवतमाळ जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यास धजावत नाही.

यवतमाळ-नांदेड हा लोहमार्ग सुरू झाल्यास यवतमाळ जिल्ह्यात शेतीशी निगडित अनेक उद्योग सुरू होऊ शकतात. यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग तत्काळ सुरू होणे गरजेचे आहे, असे भावना गवळी यांनी रेल्वे मंत्र्यांना म्हटले आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ-मूर्तिजापूर दरम्यान चालणाºया शकुंतला रेल्वेगाडीला 100 वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करणे गरजेचे झाले आहे.
ब्रॉडगेजसाठी प्रयत्न करणार
यवतमाळ-मूर्तिजापूर हा मार्ग अनेक ठिकाणी खराब झाल्यामुळे शकुंतला अतिशय मंदगतीने चालते. शकुंतला गाडी बंद व्हावी, असा रेल्वे बोर्डाचा मानस आहे. शकुंतला रेल्वे मार्ग दुरुस्त करण्यापेक्षा त्याचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये केल्यास यवतमाळ मुख्य रेल्वे मार्गाला जोडले जाईल. परिणामी, यवतमाळ-मूर्तिजापूर मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करावे, अशी मागणी मी लावून धरणार आहे.’’
भावना गवळी, खासदार, यवतमाळ.
नागरिकांचा पाठिंबा महत्त्वाचा
यापूर्वी रेल्वेच्या याचिका समितीसमोर खासदार भावना गवळी यांनी शकुंतला रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करावा, अशी मागणी केलेली आहे. यानंतर या समितीसमोर दोन सुनावणी झाल्या. त्यापूर्वी सर्वेक्षण झाले. यासाठी खासदार भावना गवळी यांचा पाठपुरावा सुरूच आहे. केंद्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असल्याने कामाला गती मिळू शकते. यासाठी नागरिकांचा दबाव वाढवणे आवश्यक आहे.’’
जनार्दन झोपाटे, नागरिक, यवतमाळ.