आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BSNL News In Marathi, Enterprises Resource Planning

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीएसएनएलच्या फायलींचा प्रवास थांबणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - फायलींचा प्रवास कमी करून कामात सुटसुटीतपणा आणण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडमध्ये (बीएसएनएल) एन्टरप्रायजेस रिसोर्सेस प्लॅनिंग (इआरपी) ही सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे हे कार्यालय पेपरलेस झाले आह़े ‘बीएसएनएल’मध्ये यापूर्वी ‘माय एचआर’ ही सिस्टिम होती़ ‘सरकारी काम अन् महिनाभर थांब’ असा कारभार असल्याने बीएसएनएलमधील सावळ्या गोंधळावर नेहमीच टीका करण्यात येत होती़ कार्यालयात छोटी वस्तू किंवा साहित्य मागवायचे म्हटल्यास मुख्य कार्यालयाला पत्रव्यवहार करून त्यांच्या मंजुरीची वाट पाहावी लागत होती़
तसेच अंतर्गत विभागांमध्ये समन्वय नसल्यानेही फाइलचा प्रवास दीर्घकाळ होत असे, तर काही फाइल विशिष्ट अधिकार्‍यांच्या टेबलवर धूळखात पडून राहत होते. त्यामुळे बहुतेक कामे प्रलंबित राहत होते. यामुळे फायलींचा हा दीर्घ प्रवास रोखण्यासाठी बीएसएनएलमध्ये ‘इआरपी’ सिस्टिम कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. कार्यालयांतर्गत माहितीची देवाणघेवाण जलद व्हावी, यासाठी ही सिस्टिम वापरली जाते. ही सिस्टिम सप्टेंबर 2013 पासून राबवण्यात येत आह़े मात्र, याची पूर्णपणे अंमलबजावणी जानेवारीपासून करण्यात आली. यासाठी ‘बीएसएनएल’ने 2009 मध्ये ‘एचसीएल इन्फोसिस्टिम’ या कंपनीला ऑर्डर दिली होती.


सुरुवातीच्या काळात या योजनेसाठी अनेक अडचणी आल्या़ यामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांचे पगार, ठेकेदारांची बिले, पेट्रोल, डिझेलची बिले निघण्यात दिरंगाई झाली. यामुळे मोबाइल टॉवरचे मेटेनन्स झाले नव्हत़े मात्र, आता यात सुधारणा झाली आह़े ही सेवा खासगी क्षेत्रांमध्ये यापूर्वीच राबवण्यात येत आहे. मात्र,‘बीएसएनएल’मध्ये प्रथमच हा उपक्रम राबवण्यात येत आह़े या सिस्टिमसाठी सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांना युजरनेम, पासवर्ड देण्यात आला आहे.


या प्रणालीचे फायदे
निर्णय त्वरित होऊ शकतात, तत्काळ कामांना मंजुरी मिळते, वेतन, प्रशासन, योजना, स्टोअर, कर्मचार्‍यांचे क्लेम (वाहन भत्ता, कल्याणनिधी) यांना लवकर मंजुरी मिळेल. तसेच कामे प्रलंबित राहणार नाहीत.