आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएल झाले ‘आउट ऑफ ऑर्डर’; वारंवार केबल तोडले जात असल्याची तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम -शहरातील भूमिगत बीएसएनएलच्या लँडलाइन व ओएफसी केबलचे काम करणार्‍या कंत्राटदाराकडून कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार केबल तोडल्या जात असल्याने बीएसएनएल तसेच त्यावर आधारित इंटरनेटसह इतर सेवा वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बीएसएनएलची सेवा दूरसंचार क्षेत्रातील उत्कृष्ट सेवा असल्याचे दर्शवले जाते. मात्र, जिल्ह्यात या सेवेत विविध कारणांमुळे व्यत्यय येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातच वाशीम शहरात या सेवेत व्यत्यय येण्याच्या कारणात आणखी भर पडली आहे.बीएसएनएलच्या लँडलाइन व ओएफसी केबल भूमिगत पसरली आहे. शहरामध्ये काही कंत्राटदारांकडून कामे सुरू आहेत. ही कामे करताना संबंधित कंत्राटदाराकडून कोणताही पूर्वसूचना न देता केबल तोडल्या जात आहेत. त्यामुळे परिणामी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ते खोदून केबलचे काम सुरू करण्याआधी तशी सूचना नगरपालिका व संबंधित दूरध्वनी कार्यालयाला कळवून त्यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, येथे काम करणारा कंत्राटदार तसे करत नसल्याने नागरिकांची डोेकेदुखी वाढली आहे. माहिती तंत्रज्ञानाशी निगडित सेवा कोलमडत असल्याने नागरिक आपला रोष बीएसएनएलवर व्यक्त करत आहेत.
नागरिकांची गैरसोय
वाशीम शहरात बीएसएनएलच्या लँडलाइन व ओएफसी केबल भूमिगत पसरली आहे. शहरामध्ये काही कंत्राटदारांकडून कामे सुरू आहेत. या कामांदरम्यान केबल तुटत असल्याने सेवा विस्कळीत होत आहे. परिणामी नागरिकांची गैरसोय होत आहे. सद्य:स्थितत बहुतांश कार्यालयीन कामे ऑनलाइन झाली आहेत. त्यामुळे दूरध्वनी सेवा कार्यान्वित असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र, शहरात केबल तुटण्याचे प्रकार घडत असल्याने बीएसएनएलची सेवा विस्कळीत होत आहे. त्यामुळे विविध कार्यालयांमधील कामांवर परिणाम होत आहे. याशिवाय इंटरनेट कॅफेसारख्या व्यवसायांवरही प्रभाव पडत आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे.
संबंधितांवर कारवाई करणार
बीएसएनएलला कोणत्याही स्वरुपाची पूर्वसूचना न देता केबलचे खोदकाम करणार्‍या जेसीबीचा चालक व संबंधित कंत्राटदारावर कारवाई केली जाणार आहे.
एन. पी. तायडे, अभियंता, बीएसएनएल, वाशीम