आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानमध्ये गावठी बंदुकीने गोळीबार, क्षुल्लक कारणावरून वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महान - एकाच समाजातील दोन गटात क्षुल्लक कारणातून वाद होऊन त्याचे पर्यवसान गावठी बंदुकीसह, तलवार, चाकू इत्यादींचा वापर होऊन बसस्थानकावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.शे. अलीम शे. महेमूद हा गुरुवारी सकाळी ते वाजताच्या सुमारास दुचाकीने बसस्थानकावर आला असता शे. मोबीन शे. मुनाफने त्याच्याकडे मोटारसायकल देण्याची मागणी केली. मात्र, अलीमने नकार दिला असता त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतरही वाद वाढतच गेल्याने उपस्थितांनी समजूत काढून भांडण मिटवले. त्यानंतर दुपारी वाजताच्या सुमारास शे. अलीमचा भाऊ शे. नाजीम शे. महेमूद हा येथील संगम हॉटेलसमोर उभा असताना शे. मोबीन पिंजर रोडकडून तलवार घेऊन आला, तर बार्शिटाकळीकडून मोबीनचा साळा शे. रियाज शे. वहाब अन्य तीन जण एमएच २९ जे ९६२ या वाहनाने येथे आले. त्यानंतर मोबीनने शे. नाजीमकडे बोट दाखवले. त्यानंतर रियाजने गावठी बंदुकीने दोन गोळ्या झाडल्या. मात्र, नेम चुकल्याने नाजीम बचावला. त्यानंतर अन्य एका जणाने चाकूने हल्ला केला. त्यातही तो थोडक्यात बचावला. यादरम्यान संगम हॉटेलमध्ये बसलेल्यांनी पिंजर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ठाणेदार शिरभाते पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यावर नागरिकांनी बसस्थानकाजवळ घडलेल्या या प्रकरणाची माहिती दिली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.