आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलाड येथील जागेचा प्रश्न सोडविता येईल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - दलित बांधवांसाठी जागा पाहिजे असल्यास त्यांनी समाजातील दोन्ही गटांशी चर्चा करुन विचारांची देवाण-घेवाण करून त्याचा रितसर प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठवावा. त्यांना जागा देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. सोबतच ज्यांच्याकडे रमाई घरकुलासाठी नियमाप्रमाणे रक्कम भरण्याची कुवत नसेल त्यांनाही घरकुल देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी बेलाड येथे स्पष्ट केले.
मलकापूर तालुक्यातल बेलाड येथे ग्रामपंचायतीच्या जागेत, धार्मिक ध्वज लावण्याच्या कारणावरून गेल्या आठ दिवसापूर्वी सुवर्ण दलित वाद उफाळला होता. त्यामध्ये उभय बाजूंच्या जवळपास 200 व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, उपविभागीय पोलिस अधीकारी जी. श्रीधर, संवर्ग विकास अधिकार सावळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उभय बाजूंच्या प्रतिनिधींशी चर्चाही केली.

जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये दोन्ही समाजातील व्यक्तींचे म्हणणे ऐकूण घेतले. बेलाड गावात यापूर्वी अशा घटना घडल्या नाहीत. बाहेरील व्यक्ती समाजातील बांधवांविषयी परस्पर विरुद्ध अफवा पसरवत असतील तर त्यास बळी पडू नये. सर्व गावकर्‍यांनी एकी ठेऊन समाजात रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. कोणालाही दळण दळणे, दूध न देणे, किराणा माल न देणे, असा प्रकार आढळल्यास त्वरीत प्रशासनास कळवावे. त्यावर कार्यवाही करण्यात येईल. वैयक्तीक काही वाद असल्यास तो दोन्ही समाजाने एकत्र बसून मिटवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
यावेळी पोलिस अधिक्षक यांनीही मार्गदर्शन केले.