आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Buldana News In Marathi, ICICI Bank, Divya Marathi

खामगावात जप्त केलेले 1 कोटी रुपये ‘आयसीआयसीआय’चे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - खामगाव येथील बाळापूर नाक्यावरील स्थिर सर्वेक्षण पथकाने एका व्हॅनमधील पकडलेली एक कोटी रुपयांची रोकड अखेर आयसीआयसीआय बँकेच्या खामगाव व अकोट शाखेसाठी आलेली रक्कम असल्याचे तपासणीत समोर आले आहे. बुलडाणा जिल्ह्याचे निवडणुकीसाठी आलेले खर्च निरीक्षक सुनील रनौत यांच्या उपस्थितीत चौकशी केल्यानंतर ही रक्कम बँकांच्या सुपूर्द करण्यात आली.
बाळापूर नाक्यावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक तीन कार्यरत होते. या पथकाला दुपारी 4 च्या सुमारास संशय आल्याने या पथकाने काळ्या रंगाची एमएच-31-डीएस-4212 क्रमांकाची रोकड व्हॅन थांबवून तपासणी केली. त्यामध्ये एक कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली.