आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी व पत्नीला वाचवण्यासाठी त्यानेही घेतली धरणात उडी, तिघांच्या मृत्यूने येळगाव शोकाकुल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - येथील येळगाव धरणात रविवारी एका चिमुकलीचे प्रेत सापडल्याने खळबळ उडाली होती. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी आणखी दोन प्रेत पाण्याबाहेर आढळले. एकाच परिवारातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याने येळगाव परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान धरणावर पाणी बघण्यासाठी आलेल्या काही युवकांना गोडबोले गेटजवळ एका चिमुकलीचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच एका विशेष टीमने धरणाची पाहणी केली. या वेळी धरणावरच दोन वयस्क व्यक्तींच्या चपला आणि पिशवी आढळून आली. त्यामुळे पाण्यात या चिमुकलीसोबत आलेल्या व्यक्तीचे शवदेखील असतील, असा प्राथमिक अंदाज येळगावकरांनी बांधला होता. मात्र, अंधार पडल्याने रविवारी धरणात उतरण्यास कोणीच तयार नव्हते. त्यामुळे हा तपास पोलिसांनी सोमवारी सकाळी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
घटनेचा दृष्टिक्षेप
सोमवारी सकाळी पोलिसांचा तपास सुरू होण्याआधीच पाण्यावर एक पुरुष आणि महिलेचे शव आढळून आल्याची माहिती पोलिसापर्यत येऊन धडकली.
लगेच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या वेळी मृतक पुरुष प्रकाश शिंगणे वय 35 रा. अकोट याच्या खिशात आधार कार्ड सापडले. त्यानुसार ते अकोटचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली, तर मृतक महिला सारिका शिंगणे वय 30 ही त्याची पत्नी असून, अकोला येथे एका संस्थेत शिक्षिका होती. रविवारी सारिकाला सुट्टी असल्याने ती आपल्या चार वर्षीय रंजना नामक मुलीसोबत पतीला भेटण्यास आली होती. दुपारी तिघांनी घरून सोबत डब्बा घेतला आणि जेवणासाठी धरणावर आले. यादरम्यान, ही घटना घडल्याने तिघांनादेखील आपले प्राण गमवावे लागले.
पती, पत्नीचा मृतदेह आढळला
सोमवारी सकाळी येळगाव धरणात प्रकाश शिंगणे व सारिका शिंगणे या दोघांचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळला. हे दोन्ही शव रात्रभर पाण्यात राहिल्याने त्यांचे शरीर जलचर प्राण्यांनी कुरतडून टाकले.
अशी घडली घटना ..
रविवारी प्रकाश शिंगणे, सारिका शिंगणे आणि रंजना तिघे दुपारी घरुन डब्बा घेवून जेवनासाठी धरणावर आले होते. जेवना नंतर धरणावर पाणी पिण्यासाठी पुढे आलेल्या रंजनाचा तोल गेला व ती पाण्यात कोसळली. हे पाहताच सारिका ने पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सारिका खोलवर गेली. हे पाहताच प्रकाश ने देखील पाण्यात उडी घेतली. सारिका खोल पाण्यात असल्यामुळे स्वताला वाचविण्याच्या प्रयत्न तीने प्रकाशला गच्च पकडले. त्यामुळे प्रकाशला पाण्याबाहेर पडता न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून करुन अंत झाला. अशी चर्चा पंकज लध्दड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचार्‍यात आहे.
आकस्मिक मृत्यूची नोंद
घटनेची पार्श्वभूमी पाहता प्राथमिक अंदाज असाच आहे की मुलगी किंवा महिला ही पाण्यात पडली असावी आणि त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात प्रकाश शिंगणे यानेदेखील उडी घेतली असावी. एकंदरीत पूर्ण घटनाच दु:खद आहे. आज सायंकाळी पोस्टमार्टम करण्यात आले. यातदेखील काहीच आढळले नाही. त्यांचे पारिवारिक जीवनदेखील चांगले होते त्यावरून प्राथमिक अंदाज हा खरा मानावा लागेल. याप्रकरणी पोलिसात आजदेखील माग काढण्यात आला आहे. नारायण तांदळे, ठाणेदार बुलडाणा

पुढील स्लाइडमध्ये, घटनाक्रम