आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Buldhana Corporation Get 53 Lakh Revenue In 10 Month

दहा महिन्यांदरम्यान मिळाला प्रशासनाला ५३ लाख महसूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्ह्यात महसूल प्रशासनाद्वारे एप्रिल २०१४ ते ३१ जानेवारी २०१५ या कालावधीत अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली होती. या कालावधीत जिल्ह्यात वाळू उपसा करून तस्करी केल्याच्या एकूण ८०५ प्रकरणांमध्ये प्रशासनाने कारवाई केली. या माध्यमातून दंडाच्या स्वरुपात प्रशासनाला ५३ लाख २८ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.

जिल्ह्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान वाळू उपसा करण्याचा कालावधी संपतो. त्यामुळे या कालावधीत वाळू उपशावर बंदी आणली जाते. त्यामुळे बांंधकाम व्यवसाय ठप्प पडतो. हिच संधी साधून काही वाळू तस्कर रात्रीच्या वेळी नदीपात्रातील वाळूचा अवैधरित्या उपसा करून तिची जास्त दराने विक्री करतात. असे प्रकार टाळण्यासाठी महसूल विभागाने वर्षभर करडी नजर होती.
खामगाव मार्गावर जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी स्वत:सुद्धा अशा वाहनांवर कारवाई केली होती. महसूल प्रशासनाने जिल्ह्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एकूण ८०५ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ५३ लाख रुपयांचा महसूल वसूल केला.

दरम्यान, महसूल विभागाच्या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

वाळूतस्करांवर गंभीर गुन्हे होणार दाखल : जिल्ह्यातरात्रीच्या वेळी वाळू तस्करीचे प्रकार होत असल्याचे दिसून येते. यापुढे वाळू तस्करांवर, वाहनचालक, मालक, खरेदीदारांवरही कठोर कार्यवाही केली जाणार आहे. वाहनाचा परवाना कायम रद्द केला करण्यात येणार आहे.

जळगावजामोद तालुका : सर्वाधिकवाळूतस्करीची प्रकरणे या ठिकाणी घडल्याचे दिसून आले. शेगाव, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर या पट्ट्यात सर्वात जास्त वाळूघाट असल्याने तस्करीचे प्रमाण वाढले आहे. या तालुक्यात सर्वाधिक सुमारे १८८ कारवाया करण्यात आल्या. तहसीलदार डी. एन. चव्हाण यांच्या नेतृत्वात सहा लाख ५८ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना

जिल्ह्यातयंदा प्रथमच वाहू लिलावात ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात आला. या पाठोपाठ आता वाळूघाटावरुन तस्करी थांबवीण्यासाठी आता एसएमएस पद्धतीचा वापर केला जात आहे. तसेच वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची माहिती, वाहनाची माहितीची सक्तीची करण्यात आली आहे. वाळूघाटावर िनयमित एक कर्मचारी उपस्थित राहणार आहे.

यापुढे फौजदारी गुन्हे दाखल होणार

^वाळूघाट लिलावातून साधारणत: तीन-चार कोटी रुपये मिळत होते. या वर्षी कारवाया अधिक झाल्याने वाळू लिलावातून तब्बल आठ कोटी रुपये मिळाले आहेत. भविष्यात अवैध गौण खनिज प्रकरणासंदर्भात फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत. दिनेशिगते, प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी, बुलडाणा

लोणार तालुका

तालुक्यातएकूण ६४ प्रकरणे नोंदवण्यात आली. या तालुक्यातून जिल्ह्यात सर्वाधिक आठ लाख ५९ हजार रुपये महसूल वसूल करण्यात आला.

सिंदखेडराजा तालुका

तहसीलदारसंतोष कणसे यांच्या नेतृत्वातील पथकाने दहा महिन्यांमध्ये एकूण ६६ कारवाया केल्या. यातून चार लाख २२ हजारांचा महसूल प्राप्त झाला.

देऊळगावराजा तालुका

तालुक्याततहसीलदार शंकर बुटले यांच्या नेतृत्वात ६८ कारवाया करण्यात आल्या. त्यामधून प्रशासनाला चार लाख ७९ हजार रुपये महसूल मिळाला.

शेगाव तालुका

शेगावतालुक्यात तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी यांच्या नेतृत्वात एकूण १२१ कारवाया करण्यात आल्या. जिल्ह्यातून सर्वाधिक महसूल नऊ लाख एक हजार रुपये वसूल करण्यात महसूल विभागाला यश मिळाले आहे.

चिखली तालुका

चिखलीशहरापासून देऊळगावमही, खडकपूर्णा हा परिसर जवळ आहे. त्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी चोरटी वाळू वाहतूक केली जाते. तिथे तहसीलदार राजेश्वर हांडे यांच्या नेतृत्वात ५७ कारवाया करण्यात आल्या.

बुलडाणा तालुका

बुलडाणायेथून धाड, देऊळगावमही, जाफ्राबाद या ठिकाणावरुन चोरटी वाळ वाहतूक केली जाते. दहा महिन्यांत १०३ कारवाया करण्यात आल्या. तहसीलदार दीपक बाजड यांच्या नेतृत्वात या कारवाया करण्यात आल्या असून, एकूण लाख १४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

चार तालुक्यांमध्ये १३८ कायवाया'

जिल्ह्यातीलमेहकर येथे एकूण ४१ कारवाया, मलकापूर २१, मोताळा ६, नांदुरा १६, खामगाव ५४ अशा एकूण १३८ कारवाया करण्यात आल्या. यामधून प्रशासनाला आठ लाख ८४ हजार रुपयांचा महसूल मिळाला. जिल्ह्यात सर्वात कमी कार्यवाया मोताळा तालुक्यात झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

शेगाव-नऊ लाख हजार
मोताळा-२८ हजार
मेहकर-२ लाख ५७ हजार
चिखली-३ लाख ४१ हजार
ज. जामोद-६लाख ५८ ह.
नांदुरा-एक लाख हजार
लोणार-८ लाख ५९ हजार
दे.राजा-४ लाख ७९हजार
खामगाव-३ लाख ८४ हजार
मलकापूर-७५ हजार
सिं.राजा-४ लाख २२ हजार
बुलडाणा-८ लाख १४ हजार