आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा : दीर-भावजयीची आत्महत्या, पत्नी बेपत्ता असल्याची पतीची तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली - शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या तांदुळाडी येथील दीर -भावजयीने गाव शिवारातील विहीरीत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. नेमक्या कोणत्या कारणावरून त्यांनी आत्महत्या केली ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणी चिखली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

समाधान शेषराव मोरे (21) आणि अंजना शिवदास मोरे (22) अशी आत्महत्या करणार्‍या दीर-भावजयीचे नाव आहे. शनिवारी सकाळी तांदुळवाडी शिवारातील गणेश शेजोळ यांच्या विहीरीत त्या दोघांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. या प्रकरणी तांदुळवाडी येथील पोलिस पाटील गणेश सखाराम गंडे यांनी चिखली पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

अंजना ह्या घरून निघून गेल्याची तक्रार त्यांचे पती शिवदास मोरे यांनी 28 ऑगस्टला चिखली पोलिस ठाण्यात दिली होती तर 31 ऑगस्टला अंजना व तिचा दीर यांचे मृतदेह हे विहीरीत आढळून आले. या प्रकरणी चिखली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोकुळ भोई करीत आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख, पोलिस निरीक्षक दिलीप तडवी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत अंजनास तीन वर्षाचा मुलगा व नऊ महिन्याची मुलगी आहे.