आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेगाव - तालुक्यातील जवळा बुद्रुक पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत भारिप-बमसंने बाजी मारत आपला झेंडा कायम ठेवला आहे. भारिप-बमसंचे सुरेश नावकार यांनी त्यांचे निकटचे प्रतिद्वंदी संतोष कान्हेरकर (काँग्रेस) यांचा एक हजार 271 मतांनी पराभव केला. भारिप-बमसंचे पंचायत समिती सदस्य महेश मसने यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
सोमवारी सकाळी तहसिल कार्यालयात मतमोजणीस प्रारंभ झाला. यावेळी पाचही उमेदवारांच्या सर्मथकांनी मोठी गर्दी केली होती. निकाल जाहीर झाल्यावर तहसिल कार्यालयावर जमलेल्या भारिप-बमंसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळून जल्लोष केला. विजयी उमेदवार सुरेश नावकार यांची मिरवणूकही शहरातून काढण्यात आली.
जागा राखण्यात यश : भारिप-बमसंचे पंचायत समिती सदस्य महेश मसने यांच्या निधनामुळे जवळा बुद्रुक गणाची पोटनिवडणुक घेण्यात आली. सत्ता कायम ठेवण्यासाठी ही जागा कायम राखण्याचे आ्व्हान भारिप-बमसंसमोर होते. भारिप-बमसंने ही जागा कायम राखली. त्यामुळे पंचायत समितीची सत्तादेखील या पक्षाकडे अबाधित राहणार आहे.
प्रस्थापितांना हादरा : पोटनिवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागल्याची प्रतिक्रिया सर्वच राजकीय पक्षांचे नेते देत आहेत. तरीही भारिप-बमसंने या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांना धोबीपछाड दिली आहे.
स्थानिक उमेदवार नसल्याचा फटका
या निवडणुकीत भाजपने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग शेजोळ यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा पराभव झाला आणि भाजप चौथ्या स्थानावर फेकली गेली. स्थानिक उमेदवार नसल्याचा फटका बसला. विजय भालतिलक, भाजप
मिळालेली मते
सुरेश नावकार (भारिप-बमसं) - 3123 (विजयी)
संतोष कान्हेरकर (काँग्रेस) -1852
संगीता खोंड ( राष्ट्रवादी काँग्रेस) - 1142
पांडुरंग शेजोळ (भाजप) - 730
शिवदास डिगोळे ((अपक्ष) - 151
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.