आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Buldhana Panchayat Samity Speaker Selection In Akola

आघाडीचे सहा, तर युतीचे पाच सभापती बुलडाण्यात आघाडीला धक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - बुलडाणा पंचायत समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असतानाही येथे काँग्रेसला फटका बसला आहे. मेहकरमध्ये समसमान सदस्य संख्या असताना वेळेवर शिवसेनेने काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा फायदा उचलून विधानसभेच्या तोंडावर मोठी राजकीय खेळी केली आहे.
दुसरीकडे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मलकापूरमध्ये झालेल्या खिचडीमुळे काँग्रेस सदस्यांच्या समर्थनावर अपक्ष विद्या नारखेडे सभापतीपदी विराजमान झाल्या आहेत. येथे शेवटी ईश्वरचिठ्ठीने ही निवड झाली. दरम्यान १३ पैकी सात पंचायत समितीमध्ये थेट महिलांच्या हाती पंचायत समितीचा कारभार गेला आहे. यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सामाजिक समीकरणे डोळ्यासमोर ठेवून काही ठिकाणी सभापती उपसभातीपदी दबदबा असलेल्या राजकारण्यांनी मर्जीतील व्यक्तींना हिरवा कंदील दिला आहे.

नांदुऱ्यात भाजप : आठसदस्यीय नांदुरा पंचायत समितीमध्ये भाजपचे अनिल इंगळे आणि शिवसेनेच्या सुनीता डिवरे अनुक्रमे सभापती, उपसभापतीपदी विराजमान झाल्या. भाजप-सेनेचे पाच सदस्य येथे आहेत. त्यामुळे त्यांचा सभापती, उपसभापती होणे निश्चित होते. विरोधकांचा प्रत्येकी तीन विरुद्ध दोन मतांनी पराभव करत येथे भाजप-सेनेने आपला बोलबाला कायम ठेवला..
सभापती-उपसभापतिपदाच्या निवडीनंतर सिंदखेडराजा येथे जल्लोष करताना कार्यकर्ते.
पंचायत समितीत पदाधिकाऱ्यांसह खासदार जाधव, आ. रायमुलकर.
खामगावात अपेक्षेप्रमाणे काँग्रेस
बुलडाणा जिल्ह्यातील सर्व १३ पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतिपदांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत आघाडीने सहा पंचायत समितीवर, तर युतीने पाच समित्यांवर वर्चस्व निर्माण केले आहे. यावरून आगामी विधानसभा निवडणुकीत उभयपक्षी काट्याची लढत होण्याचे संकेत आहेत. बुलडाणा आणि मेहकरमध्ये काँग्रेसला फटका बसला आहे. उपरोक्त दोन्ही ठिकाणी शिवसेनेने पंचायत समितीवर भगवा फडकवला आहे, तर खामगावात अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे वर्चस्व कायम आहे.
संग्रामपुरात भाजपचे पांडुरंग हागे
युतीच्याताब्यात असलेल्या संग्रामपूरमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपचे पांडुरंग हागे यांच्या गळ्यात सभापती, तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या राजवंती विश्वकर्मा यांची बिनविरोध निवड झाली. ओबीसीसाठी येथील सभापतीपद राखीव होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे पांडुरंग हागे यांची सभापतीपदी वर्णी लागली.
येथील पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्याच सदस्यांनी दगाबाजी केल्याने शिवसेनेच्या प्रभावती आघाव यांच्या गळ्यात सभापतीपदाची, तर उपसभापतीपदी रामेश्वर पाटील यांची निवड झाली. विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला जिल्हा मुख्यालयाच्या या पंचायत समितीमध्ये हा धक्का बसला आहे. १२ सदस्य असलेल्या या पंचायत समितीमध्ये काँग्रेस चार राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.
जळगाव जा. भाजपच्या राऊत
भाजप-सेनेचेसंख्याबळ अधिक असलेल्या जळगाव जामोद पंचायत समितीमध्ये भाजपच्या सविता राऊत सभापती, तर शिवसेनेचे विजय काळे उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आले. सभापतीपदासाठी भारिप-बमसंच्या मिना वाघ यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र दाखल केल्याने त्यांचा अर्ज नामंजूर झाला. उपसभापतीपदासाठी विजय काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
एकहाती सत्ता असलेल्या खामगावमध्ये सभापतीपदी काँग्रेसच्या कुसूम तायडे यांची, तर उपसभापतीपदी चैतन्य पाटील यांची निवड झाली. १२ सदस्यीय खामगाव पंचायत समितीमध्ये आठ सदस्य काँग्रेसचे असल्याने त्यांची निवड होणे क्रमप्राप्त होते. विरोधी पक्षातर्फे सभापती पदासाठी भारिपच्या वर्षा रविंद्र गुरव आणि अ. भा. किसान सभेचे जितेंद्र चोपडे यांनी नामांकन दाखल केले होते. त्यांना केवळ चार मते मिळाली. काँग्रेसच्या विजयानंतर येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष अशोक सानंदा, जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटेखेडे, पंजाबराव देशमुख उपस्थित होते.
मलकापुरात अपक्षाच्या गळ्यात माळ : मलकापूरमध्येकथित भाजपसमर्थीत विद्या नारखेडे यांची सभापती, तर भाजपचे दादाराव तायडे यांची ईश्वरचिठ्ठीने उपसभापतीपदी वर्णी लागली. सहा सदस्यीय पंचायत समितीमध्ये दोन अपक्षांच्या हाती येथील सत्तेच्या चाब्या होत्या. त्यामुळे अपक्षांची भूमिका येथे महत्त्वाची होती. त्यातच अपक्ष विद्या नारखेडे यांनी काँग्रेसच्या खेम्यातून अर्ज दाखल केला होता, तर भाजपच्या दादाराव तायडे यांना राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा मिळाला. शेवटी येथे समसमान मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीने या दोघांची सभापती उपसभापतीपदी वर्णी लागली.

देऊळगावराजामध्येअनिता झोटे : राष्ट्रवादीच्याताब्यात असलेल्या देऊळगावराजा पंचायत समितीमध्ये अखेर अनिता झोटे यांची सभापतीपदी तर सुधाकर म्हस्के यांची उपसभापतीपदी वर्णी लागली. त्यांची निवड होणे ही केवळ अौपचारिकता उरली होती. सुधार म्हस्के यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा उपसभापतीपदाची माळ पडली.

मेहकरात काँग्रेसमध्ये बंडखोरी
मेहकरकाँग्रेस, राष्ट्रवादीचे पक्षीय बलाबल समसमान असताना काँग्रेसला मेहकरात बंडखोरी भोवल्याने येथे शिवसेनेचे सागर पाटील हे सभापतीपदी विराजमान झाले, तर काँग्रेसकडून बंडखोरी करणाऱ्या िललाबाई लेकुरवाळे यांना उपसभापतीपद देण्यात आले. गेल्यावळी येथे ईश्वरचिठ्ठीने सभापती, उपसभापतींची निवड झाली होती. त्यातही नशिबाने शिवसेनेलाच साथ िदली होती. यावेळी काँग्रेसच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला पुन्हा सभापतीपद आपल्याकडे राखण्यात यश मिळाले आहे.