आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरामध्ये होते दर दोन दिवसांनी एक घरफोडी, दिवसा चोऱ्या होण्याचे प्रमाणही वाढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरामध्ये घरफोडी आणि जबरी चोरींमध्ये गत महिन्यापासून वाढ झाली आहे. प्रत्येक दोन दिवसांनंतर एक घरफोडीची घटना शहरात घडत आहे. महिनाभरात चोरट्यांनी अकोलेकरांचा १० लाख ३१ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
घर बंद असले किंवा कुणी गावाला गेले तर त्या घरी चोरी होण्याची शक्यता वाढली आहे. कोण बाहेरगावी गेले, याविषयीच्या माहितीचे चोरट्यांचे जाळे स्ट्राँग झाल्याचे दिसून येत आहे. अशा चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात तब्बल घरफोड्यांच्या घटना घडल्या आहेत, तर काही चोरीच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. महिन्यातील १५ दिवस चोरीच्या घटना घडल्या असून, दिवसाआड चोरी होत असल्याचे दिसून येते.
सर्वाधिक चोरीच्या घटना सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यांतर्गत घडल्या आहेत, तर चोरीच्या गुन्ह्याचा तपास खदान पोलिसांनी लावला आहे. त्यांनी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरी केलेला ऐवज जप्त केला आहे. तर, इतर पोलिस ठाणे मात्र चोरांचा छडा लावण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरातील गुन्हे कमी हाेण्यासाठी पाेलिसांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
चोरी रोखण्यासाठी काय करावे ?
दिवसा कॉलनी, वसाहतींमध्ये रस्त्याने वारंवार घिरट्या घालायच्या. कोणते घर बंद आहे, त्याच्या आजूबाजूचे कुटुंब रात्री कधी झोपतात, वीज केव्हा जाते, अशी माहिती गोळा करून चोरटे मध्यरात्री घरफोडी करून ऐवज लंपास करतात. तसेच मोटारसायकलवरून विनाकारण वारंवार घिरट्या घालून टेहळणी केली जाते. नागरिकांनी स्वत: साखळी पद्धतीने गस्त सुरू करण्याची वेळ आली आहे.
नागरिकांनी काय केले पाहिजे?
1निवासस्थानाच्या बाहेर प्रखर उजेड देणारा लाइट लावावा.
2 आजूबाजूला असलेले गवत, काटेरी झुडुपे काढावी.
3 अनोळखी व्यक्तीला गाव, नावासह इत्थंभूत माहिती विचारावी.
4 बाहेरगावी जाताना शेजारी, पोलिसांना माहिती द्यावी.
5 रात्री संशयास्पद हालचाली दिसल्यास सतर्क राहून पोलिसांना माहिती द्यावी.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या एप्रिल महिन्यात किती घटना घडल्या...
बातम्या आणखी आहेत...