आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business News In Marathi, Artisans Issue At Akola, Divya Marathi

‘हमारे पास दुनियाके हर ताले की चाबी है!’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ‘हमारे पास हर ताले की चाबी है!’ हा चित्रपटातील संवाद अकोल्यातील चावी व्यावसायिकांच्या बाबतीत लागू पडतो. तुमच्या कुलपाची चावी हरवली, तर काळजी करु नका, अकोल्यातील या कारागिरांबाबत तर असा लौकिक आहे की, कोणत्याही कुलपाची चावी हे कारागीर अध्र्या तासात तयार करून देतात. कुलूप त्यांच्याकडे न्यावे लागते. ते चावीवरून दुसरी चावी तयार करून देत नाही.
येथे 16 पेक्षा जास्त चावी व्यावसायिक आहेत. ते जैन मंदिराजवळ व्यवसाय करतात ते एकाच समाजाचे आहेत. चार पिढय़ांपासून हा व्यवसाय करत असल्याचे नईमुद्दीने रफीकउद्दीन (वय 50) रा. गुलजारपुरा यांनी सांगितले. तरुण पिढीही चावी कारागीर झाल्याचे ते म्हणाले. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने हा पेशा स्वीकारल्याचे ते म्हणाले.
फॅन्सी चाव्यांचा बोलबाला फॅन्सी चाव्यांचा बोलबाला आहे. यातील काही चाव्या बंदुकीच्या, तलवारीच्या आकाराच्या आहेत. या पितळेच्या चाव्या प्रत्येकी 200 ते 300 रुपयांना उपलब्ध आहेत. दुचाकींसाठी त्याचा वापर होतो.
रिमोटच्या लॉकचा वापर
बाजारात रिमोट कंट्रोल लॉकचा वापर दिसून येतो. हे लॉक श्रीमंत खरेदी करत असल्याने व्यवसायावर परिणाम झाला नाही, असे कारागीर मोहंमद फैसल म्हणाला. एखाद्याचे कुलूप उघडल्यावर खूश होऊन तो कधी बक्षीस देत नाही.
चावी कशी तयार करतात
चावी तयार करण्याकरिता कानस, पकड, पेंचीस, हातोडा,लोखंडी ओंडका आदींचा वापर होतो. या चाव्या लोखंड, पितळ, ब्रांझ व स्टील धातपासून तयार केल्या जातात. कपाटाची चावी हरवली, तर आम्ही 200 रुपये व्हिजिट फी घेतो, असे कारागिरांनी सांगितले. साध्या चावीवर कुलपातील पॉइंटचे मार्किंग केले जाते; नंतर चावी तयार करण्यात येते. चावी तयार करण्यास अर्धा तास किंवा एखाद्यावेळी दोन तासही लागतात. बरेचदा मार्किंगनुसार चावी तयार नाही झाली, तर ती फेकावी लागते. नुकसान झाले की मन निराश होते, असे ते म्हणाले.