आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business News In Marathi, Business Mans Are Not Int Resting To Invest In Akola City, Divya Marathi

उद्योजकांनी फिरवली पाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ (एमआयडीसी) समस्यांचे माहेरघर झाले आहे. येथील उद्योगांना समस्यांचे ग्रहण लागले असून, नवीन उद्योजकांनी येथील औद्योगिक वसाहतीकडे पाठ फिरवली आहे. अडचणींचा संघर्ष करणारी एमआयडीसी अधोगतीला सामोरे जात आह़े परिणामी, जिल्ह्यात बेरोजगार, उद्योजक संकटात सापडले आहेत़
अकोल्यातील उद्योग क्षेत्राचा एकेकाळी राज्यभर लौकिक होता़ आता मात्र, जिल्ह्यातील उद्योगांना अवकळा आली आह़े एमआयडीसी परिसरात पूर्वी 700 पेक्षा जास्त उद्योग होत़े त्यापैकी 300 पेक्षा जास्त उद्योग बंद पडले आहेत़ एमआयडीसी परिसरात पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने उद्योजकांची गैरसोय होत़े येथे सुरक्षेचे कारणही महत्त्वाचे असून, एमआयडीसी परिसरात पुरेसा पोलिस बंदोबस्त नाही. येथील पोलिस ठाण्याची स्थापनाही प्रलंबित आहे. औद्योगिक वसाहतीत शंभर हेक्टरवर फूड पार्क होणार होता. तो पार्क कागदावरच रेंगाळला आहे.
केंद्रीय संरक्षण खाते व इतर खासगी कारखाना संचालकांनी जागेची पाहणी केली़ मात्र, तेही कारखाने इतर ठिकाणी गेले आहेत़ राज्यात सहा ठिकाणी टेक्सटाइल्स पार्क झाल़े त्यात अमरावतीचा सहभाग झाला, तर अकोल्याला वगळले. सैन्याला लागणार्‍या दारूगोळा निर्मितीसाठी भारत कंपनीने अकोल्यात कारखाना टाकण्यासाठी 700 एकर जागा बघितली होती़ हा कारखानादेखील अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ येथे गेला. रेमण्डने 100 एकर व इतर खासगी कंपन्यांनी अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीतील जागांची पाहणी केली़ पाहणीतच दप्तर दिरंगाईचा सामना करावा लागल्याने ते परत इकडे फिरकलेच नाही. अकोला एमआयडीसी 929 हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रात चार फेजमध्ये आह़े
एमआयडीसीला घरघर : मोठय़ा उद्योगांना सहायभूत होतील, असे लघुउद्योग या एमआयडीसी परिसरांमध्ये नसल्यामुळे बहुतांश उद्योजकांनी इतर जिल्ह्यातील एमआयडीसीला प्राधान्य दिले आह़े त्यामुळे मोठे उद्योजकही येथे येण्याविषयी उदासीन आहेत. अकोला शहरातील एमआयडीसीमध्ये सुरू असलेले अनेक उद्योग सुविधेअभावी बंद पडले आहेत. नवीन उद्योजक अकोल्यात उद्योग सुरू करण्यास इच्छूक असले तरी त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नाही.
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे काय? : अकोला एमआयडीसीची सुरक्षा ऐरणीवर आहे. एमआयडीसीमध्ये स्वतंत्र पोलिस ठाणे उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून उद्योजक करत आहेत. स्थानिक आमदारांनी हा प्रo्न उचलूनही धरला. मात्र, त्यावर अद्यापही काहीच कार्यवाही झालेली नाही.
सुविधांचा अभाव : दळणवणाच्या सोयी, चांगले रस्ते, अखंड वीजपुरवठा आणि विकासाला सहायभूत होतील, आदी बाबी उद्योगांना उभारी मिळण्यासाठी गरजेच्या असतात. मात्र, औद्योगिक वसाहतीमध्ये चांगले रस्ते, कमी दरात पाणी या मुख्य सुविधा मिळत नसल्याने अनेक उद्योग गाशा गुंडाळत आहेत.
उदासीनता घातक : उद्योग-धंदे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारी महत्त्वाची साधने आहेत़ अधिकार्‍यांचे असहकार्य, पूरक लघुउद्योगांच्या अभावासह दळणवळणाची तोकडी साधने या त्रांगड्यामुळे दहा ते पंधरा वर्षांत एकही मोठा खासगी उद्योग उभारलेला नाही. या उलट अडचणींमुळे आहे तेच उद्योग बंद करण्यापेक्षा चालतील तसे सुरू ठेवलेले बरे अशा मन:स्थितीत उद्योजक आहेत,असे चित्र आहे.
उद्योजकांना अनेक समस्या
4अकोला एमआयडीसीमध्ये उद्योगांसाठी सुविधा नाहीत. त्यामुळे नवीन उद्योग यायला तयार नाहीत. अस्तित्वातील उद्योजकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विकासासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.’’ द्वारकादास चांडक, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रिज असो. अकोला
जिल्ह्याच्या विकासाचे ‘अर्थ’चक्र मंदावले
लोकप्रतिनिधी करतात व्यापार्‍यांची बोळवण
मूलभूत सोयी, सुविधांकडे प्रशासनाने केले दुर्लक्ष
महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ (एमआयडीसी)
विकास ठप्प । जिल्ह्यात विकासाची गती खुंटली