आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छंद म्हणून जाेपासलेल्या कुंचल्यातून व्यवसायाकडे झेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कला कोणतीही असो, ती प्रशिक्षण घेतल्याने येते. उपजत कलेला वाव, संधी, चालना मिळाली की, मग गती मिळते आणि एकदा का गती मिळाली की, विविध कलाकृती साकारल्या जातात. या कलेचे गुण बालपणीच आढळून येतात. त्या कलेला लहानपणी थोडे खतपाणी मिळायला हवे. मग कधी छंद म्हणून जोपासलेली कला पुढे व्यवसाय होते. याचा प्रत्यय येथील युवा कलावंत शुभांगी डांगे हिच्या कलाकृती पाहिल्यानंतर येतो.

कलेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या अाविष्काराच्या सूक्ष्म अध्ययनातून मानवाच्याच नव्हे, तर प्राण्यांच्याही भावभावना, इच्छा, आकांक्षा, ध्येय, सौंदर्यकल्पना, निर्सग, सुप्त इच्छा, गूढ नात्याची उकल कलाकार आपल्या कलेतून सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. या कलावंतांमुळेच निसर्गात दडलेले सौंदर्य, प्रमाणबद्धता कलावंत आपल्या प्रतिभाशक्तीने शोधून काढतो आणि आपल्या कृतीतून प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो. शुभांगीच्या कलाकृती प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या की, याची अनुभूती येते. बीएससी (मॅथ) शिकलेल्या शुभांगीला रंग आणि कुंचल्याची आवड बालपणापासूनच होती. त्यामुळेच तिने एकीकडे शिक्षण घेताना दुसरीकडे कलाकृतीचे धडेही गिरवले. तिच्या आई-वडिलांनीही तिला सतत प्रोत्साहित केले. त्यामुळेच तिला छंद जोपासता आले.

शुभांगी सिरॅमिक, म्युरिल्स, डेंटल प्लास्टिक, सिपोरिक्स स्टोनचा आपल्या कलाकृतीत खुबीने वापर करते. साध्या प्लायवूडचाही विविधांगी उपयोग शुभांगीने आपल्या कलाकृतीत केला आहे. कोणत्याही कलाकृतीचा प्रथम साचा तयार करून त्यावर शुभांगी बारीक काम करते. शुभांगीने नागपूर आणि पुणे येथे जाऊन प्रशिक्षण घेतले. त्यामुळेच तिने साकारलेल्या विशाल झाडाच्या खोडातील राधा-कृष्ण असो, उंट हाकणारा माणूस, नाइट लॅम्प, टी-पॉय, विविध फ्रेम, मातीच्या घागरीतून साकारलेली विविध कलाकृती, चौरंग, पाट, रंगवलेली आकर्षक घड्याळे असो. तिची प्रत्येक कलाकृती भाव खाऊन तर जातेच, परंतु डोळ्याचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाही. कधीकाळी छंद म्हणून जोपासलेली कला आज तिचा व्यवसाय झाला आहे. शुभांगी कलाकृतीच साकारत नाही, तर ती उत्कृष्ट रांगोळी आणि मेंदी काढण्यातही पटाईत आहे. आज शुभांगीने स्वत:ची छोटेखानी का होईना गॅलरी सुरू केली आहे. कलेची आवड जाण असलेल्या अनेक नवोदित कलावंतांना घडवण्याचे काम ती करत आहे.

कलेला स्कोप मिळावा
आपल्या शहरात पाहिजे तेवढ मार्केट या कलेसाठी उपलब्ध नाही. या कलेतूनही युवक-युवतींना करिअर करणे शक्य आहे. या कलेला मार्केट मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींसोबतच सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा. तसे झाल्यास कलावंताना अकोला सोडून जाण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे अावश्यक अाहे.'' शुभांगी डांगे

कुटुंबवत्सल शुभांगी
शुभांगीकेवळ कलाकृतीतून आपल्या भावना व्यक्त करत नाही, तर ती प्रत्यक्षातही तशीच जगते. नागपूर, पुणे शहरांमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तिच्या कलेला या मोठ्या शहरांमध्ये स्कोप मिळाला असता. परंतु, कुटुंबाला सोडून राहायचे नाही, या भावनेने तिने आपल्या गावातच राहणे पसंत केले. तिच्या मते आपल्या पाठीशी कुटुंब असणे किंवा आपण कुटुंबासोबत असणे अत्यंत गरजेचे आहे.
बातम्या आणखी आहेत...