आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाड्या विकणारे रॅकेट अकाेल्यातही सक्रिय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - औरंगाबादला चार चाकी गाडी भाड्याने घेऊन ती अकोल्याला आणून विकण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात औरगांबाद येथील दोघांविरुद्ध रामदासपेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाड्याच्या गाड्या विकणाऱ्या रॅकेटचा शोध घेण्यासाठी पोिलस औरंगाबादला गेले असून, अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहेत.
औरंगाबाद येथील मीर सफदर अली याने मागील सहा महिन्यांपूर्वी माया टूर्स ट्रॅव्हल्सचे सनी किशोरलाल गुणवानी (वय २५ वर्षे ) याच्याकडून सहा महिन्यांसाठी फियाट लिनिया एम एच २० सीएस ७३८९ ही गाडी भाड्याने घेतली होती. अली याचा टूर्स ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्याने पहिले तीन महीने ही गाडी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भाडेतत्त्वावर लावली. त्यानंतर मात्र ती अकोल्याला आणली. या ठिकाणी विनानंबर प्लेट ही गाडी फिरवली एका स्थानिक गॅरेजवाल्याला हाताशी धरून ती गाडी सहजदखान अनिस इक्बाल खान यांना एक लाख रुपये अॅडव्हान्स घेऊन विकली. गाडीचा सौदा शंभर रुपयाच्या बाँडवर साडेतीन लाख रुपयात झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान औरंगाबाद येथे आपली गाडी दिसत नाही म्हणून गुणवानी यांनी अली याच्याकडे ‘गाडी परत दे’ असा तगादा लावला. तशी आैरंगाबाद येथील क्रांती चौक पोलिसांकडे तक्रारही दिली. िमत्र परिवाराच्या मदतीने सब्दर अलीला घेऊन ते अकोल्याला आले त्यांनी सहजदखान यांच्याकडून पुन्हा दोनदिवस बाहेरगावी जायचे आहे म्हणून गाडी परत आणली. एकीकडे औरंगाबाद येथील एका जणाची फसवणूक झाली, तर त्याच गाडीचा वापर करून अकोल्यातही एकाची फसवणूक झाली आहे.
जुनी गाडी घेताना घ्या खबरदारी
-एखाद्यागॅरेजवाल्याला हाताशी धरून जुनी गाडी विकायची. १०० रुपयांच्या बॉन्डपेपरवर करार करायचा, त्यापोटी एक लाख रुपये घ्यायचे. चार-पाच दिवसांनी अर्जंट काम आहे म्हणून ज्याच्याशी सौदा झाला त्याच्याकडे जाऊन दोन दिवसांसाठी गाडी ताब्यात घ्यायची ती परत आणायचीच नाही, असे प्रकार घडत आहेत.गाडी विकत घेताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. सुधाकरदेशमुख, पोिलसनिरीक्षक, रामदासपेठ पोिलस ठाणे.