आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार चोरणारी टोळी गजाआड, गुजरातहून घेतले तीन जणांना ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- नव्या करकरीत कार चोरायच्या आणि त्या इतर राज्यांत विकायच्या, असा गोरखधंदा करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली. गुजरात पोलिस आणि सिव्हिल लाइन्स पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या. मंगळवारी या टोळीतील तिघांना पोलिस अकोल्यात घेऊन आले. या चोरांनी चोरीची कबुली दिली आहे.
शहरात दुचाकी चोरणारे सक्रिय असताना गेल्या काही महिन्यांमध्ये कार चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र, कार चोरीचा छडा लागत नव्हता. गेल्या सहा महिन्यांपूर्वी बाभुळगाव येथील एका ढाब्याहून महिंद्रा पिकअप गाडी चोरीला गेली होती. लोणार तालुक्यातील कारेगाव येथील विकास केशव चव्हाण यांची एमएच २८ एबी २०५० क्रमांकाची महिंद्रा पिकअप कार १० एप्रिलच्या रात्री शिवणी येथील मलिक ट्रान्सपोर्ट समोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी विकास चव्हाण यांनी २७ एप्रिल रोजी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात कार चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी घटनेची चौकशी करून अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, गेल्या आठवड्यात गुजरात येथील म्हैसागर तालुक्यात लोणवाडा पोलिसांनी कारला अडवले. या वेळी पोलिसांना समाधानकारक उत्तर कारचालकाने दिल्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी कारसह या कारमध्ये चालकाला ताब्यात घेतले. त्याने अकोल्याहून कार चाेरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिस कोठडीत घेतले असता आणखी दोघांचे नाव समोर आले. लोणवाडा पोलिसांनी सिव्हिल लाइन्स पोलिसांशी संपर्क करून त्यांना चोरट्यांची माहिती दिली असता, १० एप्रिल रोजी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आर. एन. जोशी, पोलिस हेडकॉन्स्टेबल विजय गव्हाणकर, गजानन पाचपोर, गजानन बांगरे, राजेश वाकोडे, अनिल गाडवे यांनी आरोपी जुबेरसिंग नाजीरसिंग पठाण वय ४०, (सनावत, खंडवा) रायसिंग रामसिंग बारेला वय २७ (नेपानगर जिल्हा बऱ्हाणपूर), गोरेलाल जंजालसिंग बारेला वय २४ (सिद्रवाडी थानला, नेपानगर) यांना ताब्यात घेतले.
कार चोरीची कबुली
आम्हालामहिंद्रा पिकअप कंपनीची विनानंबरची कार चोरायची होती. मात्र, तशी कार मिळाल्यामुळे आम्ही ही कार चोरली, अशी कबुली तिन्ही आरोपींनी पोलिसांना दिली आहे., त्यांनी आणखी किती कार चोरल्या, त्यांचा म्होरक्या कोण, त्यांनी कुठे कुठे कार विकल्या, यासंदर्भात माहिती घेण्यासाठी पोलिसांनी आरोपींची पोलिस कोठडी मिळवली आहे.
सागवानाची वाहतूक
नवीकोरी कार चोरायची आणि या कारचा वापर नेपानगरमध्ये चोरीचे सागवान वाहतुकीसाठी करत होते. खाली सागाचे लाकूड आणि त्यावर भुसा टाकून सागवानची तस्करी करताना पोलिसांनी चोरट्यांना पकडले.
बातम्या आणखी आहेत...