आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिवरखेडच्या "त्या' दोन्ही वीज अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा- वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनीच्या चकरा मारल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्यानंतर तालुक्यातील तळेगाव बाजार येथील युवा शेतकऱ्याने हिवरखेड वीज वितरणच्या कार्यालयातच १९ मे रोजी विष प्राशन केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अखेर हिवरखेड पोलिसांनी युवा शेतकऱ्याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोन अभियंत्यांविरुद्ध कलम ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून, हे दोन्ही अधिकारी मागील सात दिवसांपासून फरार आहेत.
तळेगाव बाजार येथील विनोद रामदास खारोडे या २४ वर्षीय युवा शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतामध्ये मे २०१३ रोजी बँकेचे कर्ज काढून बोअरवेल केले. त्यासाठी वीज जोडणी मिळावी म्हणून सन २०१३ मध्येच वीज वितरण कंपनीकडे अर्ज केल्यानंतर २० फेब्रुवारी २०१४ रोजी कोटेशनचा भरणा केला. त्यानंतर वीज जोडणीसाठी विनोदने तेल्हारा येथील अभियंता राजेंद्र राऊत हिवरखेड येथील कनिष्ठ अभियंता संदीप घोडे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी वीज जोडणीसाठी २० हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय वीज मिळणार नसल्याचे सांगितल्याने विनोद हतबल झाला.
विनोदला हिवरखेड वीज वितरण कार्यालयातही मानसिक त्रास देण्यात आला. अखेर त्याने १९ मे रोजी अभियंता घोडेसमोरच विष प्राशन केले. त्याला नागरिकांनी प्रथम हिवरखेडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर अकोला येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान २० मे रोजी त्याचा मृत्यू झाला. विनोदचे वडील रामदास खारोडे यांनी राजेंद्र राऊत संदीप घोडेविरुद्ध २० मे रोजीच तक्रार दिल्यानंतर हिवरखेड पोलिसांनी आज, २७ मे रोजी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार जितेंद्र साेनवणे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अशोक सूर्यवंशी, अनिल वक्ते करत आहेत.
दोषी अधिकाऱ्यांना त्वरित अटक करा
विनोदच्याआत्महत्येस जबाबदार अधिकारी राजेंद्र राऊत संदीप घोडे यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी माजी आमदार संजय गावंडे यांनी केली. तसेच काँग्रेसचे युवा नेते महेश गणगणे यांनीही फरार आराेपींना अटक करण्याची मागणी केली. या वेळी त्यांच्यासोबत श्याम भोपळे, मनीष भांबुरकर, गजानन वानखडे, सुभाष भड काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विनोदवरच केला होता गुन्हा दाखल
विनोदच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी आधी अभियंता घोडे, राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. मात्र, घोडेंच्या तक्रारीवरून विनोदवरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
बातम्या आणखी आहेत...