आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातपडताळणीसाठी फक्त २१ कर्मचारी , १६ हजार प्रकरणे प्रलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जातपडताळणीकार्यालयात तब्बल १६ हजार प्रस्ताव रखडले असल्याने विद्यार्थ्यांसह अनेक शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे जातपडताळणीचे प्रस्ताव रखडले आहेत. हे प्रस्ताव निकाली काढण्याची जबाबदारी २१ कर्मचाऱ्यांवर असल्याने त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे.
जातपडताळणी विभागीय कार्यालयामध्ये प्रस्तावांचा ढीग साचला आहे. प्रकरणे निकाली काढण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने उमेदवारांसमोर अडचण निर्माण झाली आहे. अकोला, वाशीम बुलडाणा तीन जिल्ह्यातील जातपडताळणीच्या प्रकरणांचा न्यायनिवाडा करण्यासाठी तीन स्वतंत्र विभाग आहेत. मात्र, अत्यल्प कर्मचाऱ्यांअभावी जातपडताळणीची प्रकरणे निकाली लावण्यात समितीला अपयश येत आहे. तरीही अत्यल्प कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढला अाहे. याचा परिणाम प्रस्ताव निकाली काढण्यावर होत आहे.
प्रस्तावाकडेकानाडोळा : विद्यार्थ्यांच्याप्रस्तावाचीसुद्धा जातपडताळणी विभागाने दखल घेतली नसल्याचे वास्तव आहे.विद्यार्थ्यांसाठी ३० ऑगस्ट ही शेवटची तारीख शाळा, महािवद्यालय व्यवस्थापनाने दिली आहे. त्यामुळे आता केवळ तीन दिवस उरले असताना विद्यार्थ्यांचे प्रस्ताव निकाली केव्हा लागतील, हा गंभीर प्रश्न बनला आहे.
काहीकर्मचारी करार तत्त्वावर : तीनजिल्ह्यातील प्रस्तावांसाठी अकोल्याच्या कार्यालयातील काही कर्मचारी करार तत्त्वावर काम करत आहेत. हे कर्मचारी नवीन असल्याने ते विषयाबाबत अनभिज्ञ आहेत. नवख्या कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे काम दिल्याने याचा कामावर तर परिणाम होतच आहे, शिवाय चुका होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.
आतीलसेतू केंद्राद्वारे लूट : जातपडताळणीचेप्रस्ताव सादर करणाऱ्या कर्मचारी विद्यार्थी यांच्यासाठी शासनाने जिल्हािधकारी कार्यालयामध्ये असलेल्या जातपडताळणी कार्यालयाच्या आतच सेतू केंद्र उपलब्ध करून दिले आहे. मात्र, या केंद्राद्वारे नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचे वास्तव पाहावयास मिळत आहे.

मुदत निश्चत नाही
तब्बल१६ हजारच्या जवळपास प्रस्ताव प्रलंबित आहेत. जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही प्रस्ताव निकाली काढण्याचे प्रयत्न करत आहोत. प्रस्ताव निकाली काढण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली नाही.'' एच.पी. तुमाेड, अध्यक्ष,जातपडताळणी विभागीय समिती, अकोला