अकोला - तीनजिल्ह्यांसाठी असलेल्या विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील हजारो प्रस्ताव निकाली काढण्याची जबाबदारी दोन अधिकाऱ्यांवर येऊन ठेपली आहे. १८ डिसेंबर रोजी या कार्यालयात २० हजार ५०० प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे हजारोच्या संख्येतील प्रस्ताव केव्हा निकाली काढले जातील, असा प्रश्न जनसामान्यातून व्यक्त होत आहे.
अकोला, बुलडाणा वाशीम या तीन जिल्ह्यांसाठी अकोला येथे विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक चे कार्यालय आहे. सुरुवातीला हे कार्यालय अमरावती येथे होते. मात्र, नागरिकांच्या अनेक तक्रारींवरून तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार हे कार्यालय अकोला येथे हलवण्यात आले. यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यांचे कार्यालय मात्र अमरावती येथेच ठेवण्यात आले. अकोला येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाला समिती क्रमांक असे नामकरण देऊन प्रस्ताव निकाली काढण्याचे कार्य सुरू आहे. मात्र, तीन जिल्ह्यांच्या कामकाजाच्या तुलनेत मात्र अधिकारी कर्मचारी वर्ग देण्यात आला नाही.
विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात नागरिकांची गर्दी. जनसंपर्क अधिकारी यांचे बंद कार्यालय.
-नोकरीवर लागली तेव्हा अर्ज केला होता. आज पाच वर्षे होत आहेत. आधी कार्यालयाने उशीर केला, आता या कार्यालयात उशीर होत आहे. या ठिकाणी कुणी बरोबर माहिती देत नाही.'' गीताउंबरकार, नोकरदार.
-मोताळा तालुक्यातील खरबडी येथून आलो. पंचायत समितीला कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे. ऑक्टोबर २०१३ ला प्रस्ताव सादर केला होता. अद्याप तो निकाली काढण्यात आला नाही.'' प्रवीणचोपडे, नोकरदार.
पीआरओ गायब, नागरिक त्रस्त
जनसंपर्कअधिकारी हे पद आहे. मात्र, जनसंपर्क अधिकारी नागरिकांच्या त्रासाला कंटाळून खुर्चीवर बसत नसल्याची माहिती आहे. जनसंपर्क अधिकारी हे महत्त्वाचे पद असल्यानंतरही जर नागरिकांना माहिती मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आम्ही प्रयत्नशील
जातप्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव प्राधान्यक्रमाने आम्ही निकाली काढत आहोत. बऱ्याच महिन्यांपासून अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याचा निपटारा वेगाने प्रयत्न करत आहोत. '' सुरेंद्र पवार,उपायुक्ततथा सदस्य.
महिला अधिकारी प्रसूती रजेवर
सहायकआयुक्त दर्जाच्या महिला अधिकारी प्राजक्ता इंगळे ह्या प्रसूती रजेवर गेल्या आहेत. समितीचे अध्यक्ष एच. पी. तुमोड सदस्य तथा सहायक उपायुक्त सुरेंद्र पवार हे दोघेच अधिकारी कार्यरत आहेत. दोन अधिकाऱ्यांना हजारो प्रस्ताव निकाली काढणे तारेवरची कसरत होत आहे.