आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई: एकाच वेळी परीक्षा; शाळांमध्ये समन्वय ठेवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सीबीएसईचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकाही एकच असल्या तरी, वेगवेगळ्या वेळी परीक्षा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न आधीच कळण्याची शक्यता होती. त्यामुळे आता सीबीएसई पॅटर्नच्या सर्व शाळांमध्ये एकाच वेळी परीक्षा होणार आहेत़
सीबीएसईच्या सर्व शाळांमध्ये समन्वय राहावा, यासाठी मुख्याध्यापकांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये मुख्याध्यापक सदस्य आहेत़ या समितीच्या माध्यमातून शाळांचे आणि विद्यार्थ्यांचेही विविध प्रश्न सोडवले जाणार असून, शाळांतर्गत सलोखा आणि एकोपा वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
सीबीएसईच्या सर्व शाळांमध्ये एकाच वेळी आणि सारखेच उपक्रम राबवण्यासाठीही या समितीच्या वतीने पुढाकार घेण्यात येणार आहे. आजच्या अपडेटेड युगात नवनवीन संशोधन, स्पर्धा परीक्षा, बदलणारे अभ्यासक्रम, करिअरची नवनवीन क्षेत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना सर्व सीबीएसई शाळांतून चालणार्‍या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. असेसमेंट टेस्ट, लाइफ स्किल ट्रेनिंग असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
दरम्यान या समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी सीबीएसईच्या वतीने मुख्याध्यापकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सदस्यांची दर महिन्याला बैठक होणार असून, त्यात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत. आता दर महिन्याला वेगवेगळ्या शाळांमध्ये ही बैठक आयोजित करण्यात येणार आह़े
सर्व शाळांमध्ये समान कार्यक्रम
समितीच्या माध्यमातून मुख्याध्यापक आणि प्राध्यापकांसाठी ट्रेनिंग देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांमध्ये विकास व्हावा यासाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आह़े विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये समान कार्यक्रम राहणार आहे.
-सुरेश लकडे, मुख्याध्यापक, स्कुल ऑफ स्कॉलर, अकोला.