आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार शहरावर ‘वॉच’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव - संवेदनशील शहर म्हणून खामगावची राज्यभर ओळख आहे. गणपती, देवी विसर्जनाच्या वेळी अनेक वेळा अनुचित प्रकार घडून येथे दंगली उसळल्या आहेत. यासर्व अनुचित प्रकारावर आणि शहरात घडणार्‍या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी कोणत्याही शासकीय निधीचा वापर न करता केवळ ठाणेदार यु. के. जाधव यांच्या लोकसंपर्कातून आणि शहरातील प्रतिष्ठांनाच्या सहकार्यातून शहरात महत्त्वाच्या ठिकाणी तब्बल 63 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

लोकसहभागातून दैनंदिन घडामोडीवर पोलिसी वॉच ठेवण्यासाठी करण्यात आलेला हा अभिनव उपक्रम जिल्ह्यात प्रथमच खामगाव शहरात राबवण्यात आला आहे. गणपती, देवी मिरवणुकीच्या वेळी खामगाव शहर कायम पोलिसांच्या विळख्यात असते. संपूर्ण शहराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त होते. याचा पोलिस प्रशासनावरही मोठा ताण येतो. या सर्व प्रकाराला काही तरी पर्याय असावा यासाठी खामगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी शहरातील सराफा मालकांशी संपर्क साधला आणि कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी न वापरता केवळ लोकसहभागातून 63 सीसीटीव्ही कॅमेरे शहरात लावण्यासाठी निधी उभा केला आहे. नुकतेच या कॅमेर्‍यांचे उद्घाटन करण्यात आले. खामगाव ही सोने-चांदीची मोठी बाजारपेठ आहे. येथील सराफांच्या प्रत्येक दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच कॅमेरे आता शहरातील हॉटेल गौरव, जयदीप मोटर्स, आर्केड टॉवर, महाजन हॉस्पिटल, र्शीनिवास होंडा, स्वामी सर्मथ संकुल आदींसह तब्बल 63 ठिकाणी लोकसहभागातून लावण्यात आलेले आहे. समाजकंटकांच्या हालचालीवर या माध्यमातून पोलिसांची लक्ष राहणार आहे.