आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrate International Yoga Day Said District Officer Shrikant

आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करावा, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- नागरिकांनी आपले शरीर सुदृढ निरोगी बनवण्यासाठी योग शिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिनात सर्वांनी उत्साहात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.
संपूर्ण भारतात तसेच युनो अंतर्गत अनेक देशांत २१ जून २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन नियोजन करण्यासाठी आज १० जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व योग संघटना, प्रशिक्षक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वीपणे साजरा करण्याचे आवाहन केले.
सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने २१ जूनला सकाळी वाजता नागरिक, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध योग संघटनांनी योग शिबिराचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी दिली.
भारत स्वाभिमान पतंजली योग समिती अकोला, युथ फोरम, नेहरू युवा केंद्राचे युवक मंडळाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातील गावागावांत आंतरराष्ट्रीय योग दिवसाबद्दलचे महत्त्व सांगून जनजागृती करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
नागरिकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिरात सहभागी होताना सोबत चटई किंवा सतरंजी, पाण्याची बॉटल सोबत आणावी, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या. या वेळी भारत स्वाभिमानचे अध्यक्ष दयाराम मेतकर, पतंजली योग समितीचे अध्यक्ष सुहास काटे, किसान पंचायतचे राजेश खांबलकर, पतंजली महिला योग समितीच्या भारती शेंडे, स्वयंसिद्धा संघटनेच्या खुशबू चोपडे, अजिंक्य साहसी संघाचे धनंजय भगत, योग शिक्षक डॉ. सतीश उटांगळे तसेच अकोला युथ फोरमचे पदाधिकारी, विविध योग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दुसऱ्या बैठकीत मिळणार अंतिम रूप
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे २१ जूनला जिल्ह्यात आयोजन करण्यात आले असून, कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सकाळी ते ७.३३ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. त्याचे अधिक बारकाईने नियोजन करण्यासाठी तथा जबाबदारींची निश्चिती करण्यासाठी लवकरच दुसऱ्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून, त्यामध्ये कार्यक्रमास अंतिम स्वरूप प्राप्त होईल, अशी माहिती क्रीडा विभागाने दिली आहे.