आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणेदार साहेब, सांगा कसे फिरायचे, १३ दिवसांत मंगळसूत्र चोरीची चौथी घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - रस्त्यानेपायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. ही घटना शुक्रवारी दुपारी वाजता सिव्हिल लाइन्स परिसरातील एसबीआय कॉलनीमध्ये घडली.
उमरखेड येथील रोहिणी किशोर इंगळे या त्यांच्या नातेवाइकांकडे आल्या होत्या. शुक्रवारी दुपारी त्या एसबीआय कॉलनीतून पायी जात असताना दोघेजण दुचाकीवरून महिलेच्या जवळ आले. एकाने महिलेच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकले आणि धूमस्टाइल पलायन केले. महिलेने आरडाओरड करताचा चोरटे पसार झाले. एका महिन्यातील ही चौथी घटना असल्यामुळे सिव्हिल लाइन्समधील नागरिकांसाठी या परिसरात गस्त वाढवण्याची गरज आहे,
एकाही चोरीचा नाही तपास : १३दिवसांत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र उडवण्याच्या घटना सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. सर्व घटनांमध्ये मंगळसूत्र चोरीची पद्धत सारखीच असून, चारही घटनांमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनीच चोरी केली आहे, असे असताना पोलिसांना एकाही घटनेचा सुगावा लावता आला नाही. त्यामुळे या परिसरात काहीही कारवाई होत नाही, असा गैरसमज चोरट्यांचा झाला आहे. त्यामुळे त्यांना सिव्हिल लाइन्स परिसर हा सुरक्षित वाटत आहे.
पहिली घटना-डिसेंबररोजी सकाळी अमृतनगरमध्ये एक वृद्ध महिला सिद्धिविनायक मंदिरात कीर्तनासाठी जात होती. दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पळाला.
दुसरी घटना-डिसेंबररोजी रात्री सुधीर कॉलनीमध्ये ६५ वर्षीय महिला शेजारी बारशाच्या कार्यक्रमाला जात होती. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपये िकमतीचे मंगळसूत्र उडवले.

तिसरी घटना-१३डिसेंबरीला दुपारी जठारपेठेतील शंकरनगरात वृद्धा मंदिरात दर्शनासाठी जात होती. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गळ्यातील ६० हजार रुपये िकमतीचे मंगळसूत्र चोरून नेले.
चौथी घटना-१९डिसेंबर रोजी दुपारी वाजता एसबीआय कॉलनीतून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र उडवले. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.