आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापतींकडे सोपवला समित्यांचा कारभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतींना मंगळवारी खाते सोपवण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख यांना शिक्षण व बांधकाम खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली, तर राधिका धाबेकर यांच्याकडे अर्थ व आरोग्य समितीची सूत्रे देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ही प्रक्रिया पार पडली.
विषय समिती सभापती व सदस्यांची निवड करण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख यांच्याकडे शिक्षण व बांधकाम समिती, रामदास मालवे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समिती आणि राधिका धाबेकर यांच्याकडे अर्थ व आरोग्य समितीची जबाबदारी सोपवण्यात आली. या सभेमध्ये दहा विषय समित्यांसाठी 83 सदस्यांची निवड करण्यात येणार होती. मात्र, यासाठी सर्वपक्षीय बैठक घेऊन सदस्यांची निवड करण्याचा ठराव घेण्यात आला. यासंदर्भात 15 फेब्रुवारीला विशेष सभा घेण्याचे ठरवण्यात आले. या सभेत 21 डिसेंबर 2013 च्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शरद गवई, सदस्य विजय लव्हाळे, नितीन देशमुख आणि सर्व विभागप्रमुखांची उपस्थिती होती.