आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chargesheet Logded Against Arvind Kejriwal In Akola Police

अरविंद केजरीवालांविरोधात अकोला पोलिसात तक्रार दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दिल्लीचे मुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्ट नेत्यांच्या यादीत भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश केला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या भावना दुखावल्या असून, गडकरी यांची बदनामी झाल्याने केजरीवाल यांच्या विरोधात भाजपचे नेते पवन पाडिया यांनी पोलिस ठाण्यात रविवारी तक्रार दिली.
केजरीवाल यांनी भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांच्या नावाचा उल्लेख भ्रष्ट नेत्यांमध्ये केला आहे. या नेत्यांविरुद्ध लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार उभे करून त्यांना संसदेत जाण्यापासून लगाम लावणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे पक्षातून केजरीवाल यांचा निषेध होत आहे.