आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे असतानाही बँकेत "चेक बाऊन्स', ग्राहकाला सहन करावा लागला मानसिक त्रास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बँकेतवाहन विक्रेत्याला दिलेल्या धनादेशापेक्षा अधिक रक्कम खात्यात असताना स्टेट बँक ऑफ , इंडियाच्या स्थानिक गोरक्षण मार्गावरील एका शाखेत चक्क चेक बाऊन्स करण्यात आला. चेक बाऊन्स झाल्याने मात्र वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे स्टेट बँकेतही असे गलथान कामकाज चालते, याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अकोट न्यायालयात श्याम काळे कार्यरत आहेत. त्यांनी टीव्हीएस वेगा दुचाकी गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. गाडीचा रंग निश्चित झाल्यानंतर त्यांनी टीव्हीएस कंपनीला पाच नोव्हेंबर २०१४ या तारखेचा ६० हजार ४८ रुपयांचा स्टेट बँकेचा चेक दिला. चेक दिल्यानंतर श्याम काळे यांच्या खात्यात एकूण ७० हजार रुपये बॅलन्स होते, तर चेक केवळ ६० हजार रुपयांचा होता.

त्यामुळे चेक वटल्यानंतरही त्यांच्या खात्यात दहा हजार रुपये शिल्लक राहणार होते. मात्र, काळे यांच्या खात्यात जमा असलेल्या रकमेकडे बँकेने दुर्लक्ष करत दिलेला धनादेश बाऊन्स करत टीव्हीएस कंपनीला परत दिला, तसेच काळे यांच्या खात्यात एवढी रक्कम नसल्याचेही नमूद केले. चेक परत आल्यामुळे काळे यांना धक्का बसला. खात्यात पैसे असताना चेक बाऊन्स कसा झाला? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला तर दुसरीकडे कंपनीनेही पैसे नसताना चेक कसा दिला? याची विचारणा केली. त्यामुळे काळे यांना मानसिक त्रास सहन करावा लागला.

अखेर काळे यांनी बँकेत जाऊन विचारणा केली, पासबुकात शिलकीची नोंद करण्यास सांगितल्यानंतर त्यांच्या खात्यात ७० हजार रुपये शिल्लक असल्याचे लक्षात आले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी झालेल्या प्रकाराबाबत श्याम काळे यांच्याकडे

दिलगिरी व्यक्त केली.
परंतु, या सर्व प्रकारामुळे काळे मात्र नाहक वेठीस धरल्या गेले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन केले. याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी कर्तव्याकडेही लक्ष द्यावे, अशी अपेक्षा काळे कुटुंबीयांनी व्यक्त केली.