आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात 'रसायना'चा रस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे फळांची मागणी वाढली आहे. मात्र, कमी कालावधीत जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी व्यापारी आणि काही फळ उत्पादकांकडून फळे पिकवण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर केला जात आहे. तो शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. परिणामी, त्वचारोग, पोटाचे विकार आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांनाही आमंत्रण मिळत आहे.

लवकर फळे पिकावी यासाठी बंदी असलेल्या रसायनांचा वापर केला जात आहे. ही फळे खाल्ली किंवा त्यांचा रस प्राशन केला, तर त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेऊन कृत्रिमरीत्या फळे पिकवणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

असा ओळखा केमिकल लोचा
'स्टेरॉइड'चेइंजेक्शन दिलेल्या टरबुजाचे फळ लालबुंद असले तरी कापल्यानंतर आतील गरांत तंतूचे जाळे तयार झालेले असते. ते भरीव राहता तुटक-तुटक असते. यावरून इंजेक्शन दिलेले टरबूज ओळखले जाऊ शकते.
>मेणलावलेल्यासफरचंदांना चकाकी असते. सफरचंद नैसर्गिकपणे चकाकतच नाही. शिवाय सफरचंदाला "पिटोशिन' इंजेक्शएन दिलेले असेल तर त्या ठिकाणी बारीक डाक पडतो. काही व्यापारी तेथे "ओके, टेस्टेड, एक्स्पोर्ट क्वाॅलिटी' आदी नावांचे स्टीकर लावून तो डाग झाकतात. मात्र, हा डाग वाहतुकीमुळे अथवा फळे हाताळताना पडला की इंजेक्शनने, हे ओळखता येऊ शकते.
>इथेलिनच्यासाहाय्याने पिकवलेल्या द्राक्षांना दवाखान्यातील स्पिरिटसारखा वास येतो. खायला तीही गोड लागतात. मात्र, शरीरासाठी ते हानिकारक असतात.

नैसर्गिकरीत्या पिकण्यासाठी किमान आठ दिवस
नैसर्गिकरीत्याफळ पिकण्यासाठी ते १५ दिवस लागतात. पूर्वी खेड्यांमध्ये आंबा पिकवण्यासाठी स्वतंत्र खोली असायची. त्याला माजघर म्हटले जायचे. कच्चा आंबा अर्थात कैरी झाडल्यानंतर तो या माजघरात नैसर्गिकरीत्या पिकवला जायचा. आज आंबा कृत्रिमरित्या पिकवला जातोय.

शरीरासाठी घातक : "स्टेरॉइड’इंजेक्शन दिलेले टरबूज खाल्ले तर शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. तर कार्बाइडने पिकवलेली फळे खाल्ल्याने अनेकांना नाक, कान, घशात खवखव होणे, लिव्हर निकामी होणे, पोट छातीत जळजळ होणे असे आजार होतात. त्वचेच्या अल्सरशिवाय कर्करोगाची भीतीही असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सफरचंदांवर मेण केळीपण दूषित
काही वेळा सफरचंदांनासुद्धा हे इंजेक्शन दिले जाते. बाजारात अनेक ठिकाणी चकाकणारे सफरचंद दिसून येतात. त्यासाठी सर्रास "मेणा’चा वापर केला जातो.
केळी पिकवण्यासाठी अनेक ठिकाणी "इथिलीन’ हे रसायन वापरले जाते. त्यामुळे पिकवलेली केळी ही पिवळीधमक दिसते. पण, खायला फारशी गोड नसते.

गंभीर आजार जडू शकतात
रसायनांचाअंश फळांच्या माध्यमातून पोटात गेला तर पचनसंस्था बिघडू शकते. हॉर्मोन्समध्ये बदल होतात. ही रसायने पोटात साठून एखादा ट्युमरही होऊ शकतो. विशेषतः लहान मुलांना फळे खायला देताना काळजी घेतली पाहिजे. फळांच्या अतिरिक्त सेवनाने लहान मुलांना अतिसार, उलट्या असे विकारही लवकर होतात. डॉ.सतीश झडपे, होमिओपॅथी तज्ज्ञ.

पपई, टरबुजाला "स्टेरॉइड’ इंजेक्शन
पपईसहटरबुजांचा आकार वाढवण्यासाठी "स्टेरॉइड' या इंजेक्शनचा वापर केला जातो. बाजारात सध्या समान आकारातील टरबूज विक्रीस आलेली दिसतात. एकाच आकारातील टरबूज बघून अनेकांना नवलसुद्धा वाटत असते. हे टरबूज चार ते आठ किलोपर्यंतसुद्धा असतात. सडपातळ माणसांचे शरीर मांसल बनवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात "स्टेरॉइड’ या इंजेक्शनचा वापर केला जातो. परंतु, याचा वापर टरबुजांचा आकार वाढवण्यासाठी सर्रास केला जात आहे; तसेच कुक्कुटपालन करणाऱ्या कोंबड्यांचे मास वाढवण्यासाठी 'स्टेरॉइड’ या इंजेक्शनचा वापर करतात.