आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिबळ स्पर्धा: चिमुकल्यांनी लुटला "शह अन् मात'चा थरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोल्यातील बाल गटातील बुद्धिबळपटूंना स्पर्धेचा सराव होऊन आपल्या तयारीची माहिती मिळावी, या हेतूने ब्रिलियंट चेस अॅकेडमीच्या वतीने आज १० मे रोजी विविध वयोगटांत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन झाले. उन्हाळी प्रशिक्षण शिबिरातील विद्यार्थ्यांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
सध्या उन्हाळी सुट्यांमुळे अद्ययावत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शहरात करण्यात आले आहे. या शिबिरात नियमित सराव करणाऱ्या बुद्धिबळपटूंना स्पर्धेचे वातावरण मिळावे, प्रतिस्पर्ध्यांशी लढताना येणाऱ्या अडचणी, आपल्या उणिवा कळाव्यात म्हणून खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन ब्रिलियंट चेस अॅकेडमीच्या वतीने करण्यात आले होते. सदर स्पर्धा पाच वर्षांआतील, नऊ वर्षांआतील खुल्या गटातील मुलामुलींसाठी घेण्यात आली. स्पर्धेचे उद््घाटन डॉ. लेखा गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर तीनही गटांत विविध स्पर्धकांमध्ये तुल्यबळ लढती रंगल्या. विजयी खेळाडूंना रालतो विज्ञान महाविद्यालयातील प्रा. पूनम अग्रवाल यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेत वर्षांआतील वयोगटात प्रथम क्रमांक आर्यन खत्री, द्वितीय क्रमांक अदिती देशपांडेने पटकावला, तर वर्षांआतील वयोगटात प्रथम स्थान विनीत चांडकने पटकावले. मयंक टावरी उपविजेता ठरला, तर खुल्या गटात प्रथम क्रमांक जुगल भाटिया, द्वितीय क्रमांक प्रथमेश व्यास याने पटकावला आहे.
त्याचबरोबर आशी बरडिया, समायरा हेडा, सर्वेश अग्रवाल, पार्थ वसंतकार, साहील कुळकर्णी, आरती देशपांडे, सनत अंबारखाने, स्वामिनी राऊत, आस्था खत्री, मधुरा अंबारखाने, अथर्व दळवी, शर्व कोलवाटकर, आर्यन अग्रवाल, ध्रीती शाह यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून जितेंद्र अग्रवाल यांनी काम पाहिले.
तीन वर्षीय चिमुकली ठरली आकर्षण
ब्रिलियंटचेस अॅकेडमीच्या वतीने आयोजित खुल्या बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, स्पर्धेचे आकर्षण ठरली तीन वर्षीय चिमुकली आशी बरडिया. अवघ्या तीन वर्षं वयात तिने बुद्धिबळ खेळत प्रतिस्पर्ध्यांना चकित केले. बुद्धिबळाच्या पटावरील हत्ती, घोडे, प्रधान ती सहजगतीने हाताळत होती.
बुद्धिबळ खेळात एकाग्रता महत्त्वाची आहे
बुद्धिबळ हा खेळ फार पुरातन असून, या खेळाने बुद्धीला चालना मिळते. प्रत्येकाने किमान उन्हाळी सुट्यांमध्ये क्रीडा कौशल्य जोपासण्यावर भर द्यावा. बुद्धिबळ खेळात एकाग्रता महत्त्वाची आहे, ती अभ्यासातही उपयोगी पडते.''
-डॉ.लेखा गुप्ता.
बातम्या आणखी आहेत...