आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chestnut Winds Watch In Firest Time In Maharashtra

चेस्टनट विंग्ड पक्ष्याची महाराष्ट्रात प्रथमच नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- हिमालयाच्या पर्वतरांगांपासून ते दक्षिणपूर्वेकडील इंडोनेशिया, लाओस, कंबोडिया, थायलंड, म्यानमार, मलेशिया व शेवटी फिलिपाइन्सपर्यंत निवासी असलेला चातक पक्ष्याच्या कुळातील चेस्टनट विंग्ड कक्कू या पक्षाची महाराष्ट्रात प्रथमच नोंद झाली आहे. याबाबत अमरावतीच्या वाइल्डलाइफ अँड एन्व्हॉयर्नमेंट कंझर्व्हेशन सोसायटीचे सचिव तथा मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी माहिती दिली.

ही संस्था गेल्या 15 वर्षांपासून विदर्भात तसेच सातपुड्यातील पक्ष्यांचा अभ्यास, संशोधन व नोंदणीचे कार्य शास्त्रीय पद्धतीने करत असून, त्यांच्या सातपुड्यातील एका सर्वेक्षणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाºया वान वन्यजीव अभयारण्यात संस्थेचे अभ्यासक डॉ. जयंत वडतकर यांच्या मार्गदर्शनात काम करताना गौरव कडू, निनाद अभंग, किरण मोरे, वेद पत्की यांना चेस्टनट विंग्ड कक्कू हा पक्षी आढळून आला. या पक्ष्याचाच आकार साधारणत: 47 सेंटिमीटर, म्हणजेच भारद्वाज पक्ष्याएवढा आहे. पावसाळ्यात दक्षिण आफ्रिकेतून स्थलांतर करून येणाºया पाईड कक्कू (चातक) या पक्ष्याप्रमाणे तो दिसतो. रंगाने काळा, पंखाचा रंग विटकरी लाल, डोक्यावर काळ्याच रंगाचा छोटासा उंच तुरा तसेच मानेवर पांढरी कॉलर असते. कुकूलिडी कुळातील या पक्ष्याची इंग्रजीतील ओळख चेस्टनट विंग्ड कक्कू किंवा रेंडविंग्ड कक्कू अशी आहे.

या पक्ष्याचे शास्त्रीय नाव क्लॅमॅटोर कोरोमँड्स असे आहे. किरण मोरे, गौरव कडू, निनाद अभंग यांनी या पक्ष्याचे छायाचित्रही घेतले असून, त्याचे बारकाईने निरीक्षण करून इतर गोष्टींचीही नोंद घेतली आहे. हा पक्षी आपल्या परिसरात प्रवासी (पॅसेज मायग्रेंट) म्हणून आलेला असून, त्याच्या दक्षिणेकडील प्रवासादरम्यान त्याने सातपुड्यात काही काळ विसावा घेतला असावा. त्याच्या नोंदीमुळे मेळघाटातील पक्षी संपन्नतेत भर पडली आहे, असे मत डॉ. जयंत वडतकर यांनी व्यक्त केले.