आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेराव्या वित्त आयोगातून छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे काम करण्याचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, तेराव्या वित्त आयोगातून प्रवेशद्वाराचे काम करण्याचे आदेश महासभा, तसेच विरोेधकांनी घेतलेल्या प्रतिमहासभेत मंजूर करण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात प्रवेशद्वाराचे काम महापालिकेच्या निधीतून केले जाणार आहे. यामुळे महापालिकेत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

महापालिका अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, असे नाव देण्यात आले. तेव्हापासून मुख्य प्रवेशद्वाराच्या कामाबाबत केवळ प्रस्ताव, तसेच निविदा बोलावण्याचे काम सुरू आहे. महापालिकेत सत्ता कोणत्याही पक्षाची असो, या सत्ताधाऱ्यांनी केवळ प्रवेशद्वाराच्या गप्पाच केल्या आहेत. भाजप-सेनेने साडेसात वर्षांनंतर महापालिकेची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर पहिल्याच सभेत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचा प्रस्ताव घेण्यात आला. या वेळीही सभेत जोरदार चर्चा झाली. मात्र, महासभेनंतर काहीही झाले नाही. या सभेत प्रवेशद्वाराचे काम तेराव्या वित्त आयोगातून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, काम मात्र सुरू झाले नाही. त्यानंतर पुन्हा चार महिन्यांपूर्वी झालेल्या सभेत प्रवेशद्वाराच्या कामाचा मुद्दा उपस्थित झाला. या वेळीही तेराव्या वित्त आयोगातून काम करण्यास नगरसेवकांनी मंजुरी दिली. परंतु, तरीही काम झाले नाही.

२० दिवसांपूर्वी विरोधी गटाने प्रतिमहासभा बोलावली. या सभेतही हा मुद्दा उपस्थित झाला. विरोधी पक्षनेते साजिदखान, दिलीप देशमुख, प्रशांत भारसाकळ आदींनी प्रवेशद्वाराचे काम सुरू करण्याची मागणी केली. या सभेतही तेराव्या वित्त आयोगातून काम करण्यास नगरसेवकांनी मंजुरी दिली. परंतु, प्रत्यक्ष निविदा बोलावताना मात्र, तेराव्या वित्त आयोगाऐवजी महापालिका निधीतून काम करणारी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.
प्रतिसाद मिळेल का?

शासनाच्यापरिपत्रकानुसार तेराव्या वित्त आयोगातून महापालिका कार्यालय परिसरात विविध कामे करता येतात. तेराव्या वित्त आयोगातून काम करण्याची निविदा बोलावल्या असत्या, तर या निविदांना प्रतिसादही मिळाला असता. परंतु, महापालिका निधीतून काम केल्यास पैसा मिळत नाही. त्यामुळे या निविदांना किती प्रतिसाद मिळेल?

सूत्रधार कोण?
प्रतिमहासभेततेराव्या वित्त आयोगातून काम करण्यास मंजुरी मिळाली असताना बांधकाम विभागाने मनपाच्या निधीतून प्रवेशद्वाराचे काम करण्यासाठी निविदा बोलावणे, ही बाब अशक्य आहे. त्यामुळेच बांधकाम विभागाला हा सल्ला देणारे पडद्यामागचे सूत्रधार कोण? अशी चर्चा महापालिका परिसरात सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...