आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री अमरावतीला देणार २५ कोटींचा निधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जलयुक्तशिवार उपक्रम राबवण्यासाठी अमरावती जिल्ह्याला खास २५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. जिल्ह्यातील सिंचन वाढावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. जलयुक्त शिवाराच्या कामांबाबत फडणवीस यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते मुंबईत मुक्कामी होते. तेथे फडणवीस यांनी जलयुक्त शिवार कामांचा गित्ते यांच्याकडून आढावा घेतला. जिल्ह्यातील २५३ गावांची जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी निवड केली आहे.
मात्र, त्यासाठी अतिरिक्त २५ कोटींच्या निधीची गरज भासू शकते, असे गित्ते यांनी मुख्यमंत्र्यांच्यालक्षात आणून दिले. यावर कोणकोणत्या ठिकाणी किती निधी लागू शकतो, याचा आढावा फडणवीस यांनी घेतला. त्यानंतर अमरावती जिल्ह्याला जलयुक्त शिवार योजनेतील कामे पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीदेखील फडणवीस यांनी दिली. इतकेच नव्हे, तर अमरावती जिल्हा प्रशासनाला आवश्यक असलेला २५ कोटींचा जादा निधीदेखील प्रशासनाच्या खात्यात जमा होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. त्यामुळे जलयुक्त शिवाराची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी अमरावतीला २५ कोटी रुपये मिळण्याचे संकेत आहेत.

सकारात्मक चर्चा
जलयुक्तशिवारासाठी जादा निधी लागणार आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणीही केली. मुख्यमंत्री या मुद्द्यावर सकारात्मक होते. लवकरच हा निधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. किरणगित्ते, जिल्हाधिकारी,अमरावती.