आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांचा गुन्हेगारी ‘वर्ग’; विद्यार्थ्याला जबर मारहाण, खंडणीचा गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- करिअर घडवतानाच विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळत असल्याचे वास्तव शास्त्रीनगरात आठ ऑगस्टला रात्री झालेल्या घटनेच्या निमित्ताने उजेडात आले आहे. क्षुल्लक कारणावरून दोन विद्यार्थ्यांनी खासगी शिकवणी वर्गातील विद्यार्थ्याला मारहाण केली. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात दोन विद्यार्थ्यांविरुद्ध मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला. गौरव प्रकाश गावंडे असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दृष्टिक्षेप घटनेवर..
तीनही विद्यार्थ्यांमध्ये प्रभात ले-आऊट, शास्त्रीनगर येथील राजेश नळकांडे यांच्या खासगी कोचिंग क्लाससमोर मारहाणीची घटना 8 ऑगस्टला घडली. सुरुवातीला विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान नंतर हाणामारीत झाले होते.

पैशासाठी तगादा लावला
मारहाण करणार्‍या विद्यार्थ्यांनी गौरवकडे पैशासाठी तगादा लावला होता. त्यातूनच त्याला या विद्यार्थ्यांनी मारहाण केली.
-प्रकाश गावंडे, गौरवचे वडील.

खुर्चीवर बसण्यावरून वाद
विद्यार्थ्यांमध्ये क्लासमध्ये बसण्यावरून वाद झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
-प्रकाश सावकार, ठाणेदार, सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे.

क्लासचा संबंध नाही
विद्यार्थ्यांच्या मारहाणीच्या घटनेचा क्लासशी संबंध नाही. मारहाण क्लासच्या बाहेर झाली.
-राजेश नळकांडे, संचालक, नळकांडे कोचिंग क्लासेस.

वयातील बदलांचा परिणाम
पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये बदल होतो. त्यांची मानसिकता बदलते. स्वत:ला सिद्ध करताना त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो. चित्रपटातील, हिंसक दृश्यांचा प्रभाव होतो. त्यांना संस्काराची, त्यांचा मित्र म्हणून समजून घेण्याची गरज असते.
-डॉ. प्रमोद ठाकरे, मनोविकार तज्ज्ञ