आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Elaboration Camp,Latest News In Divya Marathi

शारीरिक विकासासाठी दिले योगासनाचे धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मोठी उमरी परिसरातील टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिरात संत वासुदेव महाराज स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित श्री संत गजानन महाराज सर्वांगीण विकास बाल संस्कार शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकासावरदेखील भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने शिबिरार्थींना योगासनाचे धडे देण्यात आले.
र्शी संत ज्ञानोबा तुकाराम सेवा समितीच्या वतीने टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिरात शिबिर सुरू आहे. शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी तोंडी परीक्षा घेण्यात आली, तर, बल प्राप्तीसाठी योगासने, शारीरिक कसरतीदेखील विद्यार्थ्यांना शिकवण्यात आल्यात. शिबिरात अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हय़ातील एकूण 117 शिबिरार्थींचा सहभाग आहे. 23 मे रोजी पहाटे घेण्यात आलेल्या योगासन वर्गात विद्यार्थ्यांनी मनोरम आसन, चक्री आसन, धनुरासन, मच्छासन, शिर्षासन, हलासन, सर्वांगासन, पद्मासनयुक्त मयुरासन, मयुरासनाची प्रात्यक्षिके दाखवली. शिवाजी महाराज मानकर, आकाश महाराज तिखिले यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या वर्गामध्ये प्रदीप पानझाडे, मयूर ताथोड, कृष्णा वाडेकर, अनिकेत मानकर, ज्ञानेश्वर मानकर, विक्रम चव्हाण, अभिषेक चव्हाण, केशव घोडके, महेश चंडाळणे, ज्ञानेश्वर काळदाते यांनी प्रात्यक्षिके सादर केली. सायंकाळी हरिपाठ आणि कीर्तन झाले. यात सहभागी शिबिरार्थींमधून 11 जणांची चक्री कीर्तनासाठी निवड करण्यात येऊन त्यातील एकाची कीर्तनकार म्हणून निवड करण्यात येणार असल्याचे शिबिराचे संचालक प्रशांत महाराज ताकोते यांनी सांगितले.