आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'देव तारी त्याला कोण मारी', पहिल्या मजल्यावरून पडूनही बाळ सुखरूप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पातूर - तालुक्यातील ग्राम देऊळगाव येथील अवघ्या सहा महिन्यांचे बाळ पहिल्या मजल्यावरून खाली पडूनही वाचले. या वेळी अनिकेतचा "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती', "देव तारी त्याला कोण मारी' याची प्रचिती आली.

पातूर तालुक्यातील ग्राम देऊळगाव येथे सायंकाळी वाजताच्या दरम्यान उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे अनिकेत संदीप अमरावतीकर याला त्याच्या आईने माडीवर हवा मिळावी, या उद्देशाने त्याला पहिल्या मजल्यावर नेले. अंधार असल्यामुळे अचानक बाळ आईच्या कडेवरून पहिल्या मजल्यावरून खाली पडले. त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याची शुद्ध हरपली. मात्र, बाळाला तत्काळ सहारा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार करून अनिकेतचे प्राण वाचवले. ग्राम देऊळगावमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने लोडशेडिंगमुळे ग्रामस्थ त्रस्त असून, वारंवार तक्रार करूनही विद्युत अधिकारी सुविधा देत नसल्याची खंत गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...