आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Children Cant Play On Ground Issue At Akola, Divya Marathi

विविध मैदानी खेळांपासून दुरावताहेत बच्चे कंपनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहरातील लहान मुले मैदानी खेळांपासून दुरावत असून, संगणकांवरील खेळांकडे त्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेता लहान मुलांना संगणकावरील आधुनिक खेळ आकर्षित करत आहेत.बाहेर उन्हाचा पारा वाढत असल्याने घरात खेळल्या जाणार्‍या खेळाकडे पालक वर्ग लक्ष केंद्रित करताना दिसून येतात. तेव्हा घरात खेळल्या जाणार्‍या पारंपरिक खेळांपेक्षा संगणकावरील खेळ आकर्षित करणारे असल्याने संगणकावरील खेळांना मुलांकडून पसंती मिळत आहे.

संगणकांवरील खेळांना मुलांची पसंती
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संगणकावर अँनिमेशनच्या साहाय्याने निर्मिती केलेल्या कार रेस, मशीनगन, मोटो जीपी, सॉकर आदी खेळांना लहान मुलांकडून पसंती मिळत आहे. 15 रुपये प्रती तास या दराने हे खेळ खेळण्यासाठी दिल्या जातात.’’ सुमित बुंदेले,प्लेस्टेशन व्यावसायिक

विसरताहेत पारंपरिक खेळ
लंगडी, लपाछुपी, गारगोटी, विटीदांडू, साखळी दांड, अशा प्रकारचे मैदानी व घरात खेळल्या जाणार्‍या खेळांपासून बच्चे कंपनी दुरावत आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे बच्चे कंपनीला संगणकावरील आधुनिक खेळ आकर्षित करत आहेत.

आजचे युग तंत्रज्ञानाच्या नावाने ओळखल्या जाणारे असून, कुठलेही काम एका जागी बसल्याने केल्या जाऊ शकते. मोठय़ांपासून ते लहानांपर्यंत सर्वच या तंत्रज्ञानाच्या आहारी गेले आहेत. तेव्हा तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन चॅटिंग अशा अनेक नवीन संकल्पना उदयास आल्या आहेत. या संकल्पनेसोबतच बच्चे कंपनीसाठी संगणकावरील आधुनिक खेळसुद्धा आले आहेत.

यातील बरेच खेळ ऑनलाइन असल्याने इंटरनेट कॅफे तसेच आधुनिक खेळांसाठी असलेल्या प्लेस्टेशनवर देखील लहान मुलांची गर्दी पाहावयास मिळते. तासाला 15 रुपये याप्रमाणे प्लेस्टेशनवर संगणकावरील आधुनिक खेळ खेळायला मिळतात. हे खेळ अँनिमेशनच्या साहाय्याने तयार केल्या गेले असून, बच्चे कंपनीला सहज समजणारे आहेत. परीक्षा संपल्यानंतर बच्चे कंपनी मनोरंजनाचे विविध बेत आखत असतात.

यामध्ये मैदानी खेळांसोबतच संगणकावरील खेळांचादेखील सहभाग केल्या जातो. मात्र, उन्हाळ्यामुळे पालक वर्गाकडून मुलांसाठी घरात खेळल्या जाणार्‍या पारंपरिक खेळांसोबतच संगणकावरील आधुनिक खेळांना पर्याय म्हणून पाहिल्या जाते.पारंपरिक खेळांपेक्षा संगणकावरील खेळ आकर्षक असल्याने बच्चे कंपनीला ते आकर्षित करत आहेत. त्यामुळे बच्चे कंपनी मैदानी खेळांपासून दुरावत आहे.