आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chilly News In Marathi, Akola Citizen, Commodity Market, Divya Marathi

तिखट मिरचीला अकोलेकरांची मिळतेय मोठी पसंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरातील बाजारपेठेमध्ये नागपूर, गुंटूर, आंध्र प्रदेश आदी ठिकाणांहून लाल मिरचीची आयात केली जाते. यामध्ये चवीने तिखट असलेल्या मिरचीला अकोलेकरांकडून मोठी मागणी असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.
पटना, शिफाई, चपाटा, रेशम पट्टा, तेजा, लोंगी, अंबारी, बगायती, गावरा, वारंगल, वंडराट, हेवापुरी, रसगुल्ला आदी प्रकारच्या लाल मिरचीसह पावडरही बाजारपेठेत उपलब्ध आहे. यामध्ये तिखट व स्वादिष्ट म्हणून तेजा, रंगासाठी चपाटा या मिरचीला नागरिकांकडून जास्त मागणी आहे. आहारात या लाल मिरचीला विशेष महत्त्व असून, नागरिक आपल्या सोयीप्रमाणे कमीअधिक तिखट असलेल्या मिरचीला पसंती देतात. पटना, शिफाई, चपाटा, रसगुल्ला, रेशम पट्टा, तेजा अंबारी या मिरचीची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. या मिरचीची 80 ते 100 रुपये प्रती किलो किंमत आहे.


करीसाठी खास चपाटा, रसगुल्ला मिरची
आहारात पदार्थांच्या चवीसोबतच रंगालाही जास्त महत्त्व दिल्या जाते. त्यामुळे खास करीसाठी ओळखली जाणारी चपाटा आणि रसगुल्ला ही मिरची गाहक खरेदी करतात. या दोन्ही प्रकारातील मिरची तिखट नसतात. मात्र, भाजीच्या करीला दाट रंग येत असल्यामुळे या मिरचीची विक्री होते.’’ श्रीकृष्ण जामनिक, मिरची व्यापारी, जुना भाजी बाजार


ग्राहकांची पसंती तेजाला
जास्त तिखट नसल्याने खाण्यासाठी पटना मिरची चांगली आहे. तसेच चवीलादेखील चांगली असल्याने ग्राहक या मिरचीची खरेदी करतात. स्वादिष्ट असल्याने पटना मिरचीला पसंती असून, भाजीला रंग येण्यासाठी चपाटा मिरची खायला आवडते.’’ राजकन्या भालतिलक, ग्राहक, अकोला


बाजारपेठेत विविध प्रकारच्या मिरची उपलब्ध आहेत. मात्र, आहारात तिखट पदार्थ खाण्याची आवड असल्याने तेजा मिरचीला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. ही मिरची इतर सर्व मिरचींपेक्षा तिखट असून, चविष्टदेखील आहे. मुजाहिद अहमद खान, मिरची व्यापारी, भाजी बजार