आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Toys News In Marathi, Children, Divya Marathi, Akola

लहान मुलांना आकर्षण चायनीज खेळण्यांचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे येथील बाजारपेठेत मुलांना आकर्षित करणार्‍या चायनीज खेळण्यांची मागणी वाढली आहे. या खेळण्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
उन्हाळ्याच्या सुट्यांना प्रारंभ झाला असून, लहान मुले विविध प्रकारच्या खेळांमध्ये रमलेली दिसताहेत. पारंपरिक खेळांसोबतच त्यांना आधुनिक खेळदेखील आकर्षित करत आहेत. पूर्वीची प्लास्टिकची खेळणी ही साधी होती. त्याला तंत्रज्ञानाची जोडदेखील नसायची. परंतु, तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक खेळण्यांचे स्वरूप बदलत आहे. याच प्रकारची खेळणी बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात दाखल झाली असून, त्यांना चिमुकल्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. ही अत्याधुनिक खेळणी पारंपरिक खेळण्यांपेक्षा आकर्षक असून, तंत्रज्ञानाचा वापर झाल्याने स्वयंचलितदेखील आहेत. त्यामुळे लहान मुलांचे याकडे आकर्षण वाढत आहे. बाजारपेठेत असलेल्या चायनीज खेळण्यांमध्ये व्हिडिओ गेम, स्वयंचलित कार, बंदूक आदी खेळण्यांचा समावेश आहे.


चायनीज खेळण्याच्या किमती
0स्वयंचलित कार - 30 ते 200 रुपये
0रिमोट कार - 200 ते 400 रुपये
0डॉल - 40 ते 150 रुपये
0ब्लॉक गेम्स - 150 ते 300 रुपये
0क्विन मास्टर -120 ते 250 रुपये


विविध प्रकारची खेळणी उपलब्ध
उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे चिमुकल्यांना विविध प्रकारचे खेळणी हवी असतात. बाजारपेठेत व्हिडिओ गेम, स्वयंचलित कार, हवाई जहाज, डॉल अशा प्रकारची आकर्षित करणारी खेळणी उपलब्ध आहेत. चायनीज खेळण्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने तसेच ही खेळणी आकर्षक रंगसंगतीत उपलब्ध असल्याने मुलांना आवडतात. कमलेश कुराणी, विक्रेता