आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिधापत्रिका काढताना नागरिकांची होतेय दमछाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शिधापत्रिका मिळवणे सोपे राहिले नसून, त्यासाठी नागरिकांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात शिधापत्रिकेचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. नागरिकांना शिधापत्रिका वेळेत मिळाव्यात याकरीता महसुल विभागाने एक खिडकीसारखी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.
या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिधापत्रिकेसाठी प्रस्ताव तयार करणे व तो मंजूर होण्याची वाट पाहणे, या दोन्ही बाबी सर्वसामान्य नागरिकांसाठी कठीण झाल्या आहेत. जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयात मागील काही महिन्यांपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे काम सुरू होते. यामुळे शिधापत्रिका वाटप व प्रस्ताव स्वीकारण्याची प्रक्रिया खोळंबली होती. याबाबतची सूचना जिल्ह्यातील कोणत्याच तहसील कार्यालयात फलकावर लावलेली नाही. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शुक्रवारी 7 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयातील शहर पुरवठा अधिकारी कार्यालयात 4.30 वाजता काही नागरिक शिधापत्रिकेबाबत चौकशीसाठी आले असता. त्या वेळी येथे एकही अधिकारी उपस्थित नव्हता. या कार्यालयातील शिधापत्रिकेची जबाबदारी नसलेल्या महिला कर्मचार्‍याने या नागरिकांना थातूरमातूर माहिती दिली; पण शिधापत्रिकेच्या प्रस्तावाचा त्यांचा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिलेला दिसून आला.
दृष्टिक्षेपात शिधापत्रिकांची संख्या
तालुका बीपीएल अंत्योदय एपीएल शुभ्र अन्नपूर्णा एकूण
अकोला ग्रामीण 16,398 7,709 55,853 2,350 420 82,730
अकोला शहर 7,312 1,516 58,171 3,940 298 71,237
बार्शिटाकळी 11,394 6,698 11,109 1,766 95 31062
अकोट 18,838 8,057 17,723 2,116 242 46,976
तेल्हारा 9,249 6,102 16,147 832 188 32,518
बाळापूर 14,899 4,528 13,940 1,970 224 35,561
पातूर 8,185 3,847 8,503 1,154 147 21,836
मूर्तिजापूर 9,966 6,140 16,585 232 174 33,097
एकूण 96,241 44,597 1,65,031 14,360 1,788 3,22,017