आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Citizens Solve Water Problem Through Their Own Efforts

लोकसहभागातून बांधलेला बंधारा भागवतोय तहान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलेगाव - लोकसहभागातून केलेले कार्य कसे उपयोगी पडते, याची प्रचिती पातूर तालुक्यातील विवरा परिसरातील नागरिकांना येत आहे. विवरा येथील निर्गुणा नदीवर लोकसहभागातून बांधण्यात आलेला मातीनाला बंधारा सद्य:स्थितीत तीन गावांची तहान भागवत आहेत.
सुमारे पाच हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या विवरा येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या ११ आहे. गावात प्रत्येक घरी विहीर असतानाही उन्हाळ्यात पाणीपातळी खालावून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असे. त्यामुळे नेहमीच भासणा-या पाणीटंचाईवर उपाय म्हणून येथील सरपंच संध्या पजई यांनी लोकसहभागातून नाला बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. त्याला सदस्य नागरिकांनी सुद्धा प्रतिसाद देत हा प्रयत्न यशस्वी केला.
सध्या या बंधा-यात मुबलक पाणी असून, त्याचा उपयोग शेती सिंचन, पिण्याच्या पाण्यासह जनावरांची तहान भागवण्याकरिता होत आहे. विशेष म्हणजे बंधा-यात मुबलक पाणी असल्यामुळे गावातील विहिरींनासुद्धा चागंल्या प्रमाणात पाणी आहे. या बंधा-यांतील पाण्याचा उपयोग केवळ विवरा येथील ग्रामस्थांनाच होतो असे नाही, तर परिसरातील वरणगाव आणि चरणगावलासुद्धा होत आहे. या दोन्ही गावांची लोकसंख्या जवळपास सहा हजार आहे. या बंधा-यांमुळे येथील नागरिकांचीसुद्धा पाण्याची समस्या मिटली असून, शेतीसाठी हा बंधारा वरदान ठरत आहे. हा मातीनाला बंधारा दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर बांधण्यात येतो.
लोकसहभागातून निर्माण केलेला विवरा येथील नाला बांध.

पाण्याची समस्या मिटली
नदीवरीलमातीनाला बंधा-यामुळे गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली अाहे. त्यामुळे येथे जाणवणारी पाण्याची समस्या सध्यातरी मिटली आहे. लोकसहभागातील हा उपक्रम ग्रामस्थांसाठी निश्चितच फायद्याचा ठरत अाहे. त्यासोबतच शेती जनावरांचीसुद्धा तहान भागत आहे. कवितालहामगे, गृहिणी, विवरा

शासनाने पुढाकार घ्यावा
निर्गुणानदीवरील मातीनाला बंधारा पक्क्या स्वरूपात बांधल्यास शेती पिण्याच्या पाण्याची समस्या भविष्यातही मार्गी लागू शकेल. त्यामुळे या माती नाला बंधा-याचे सिमेंट काँक्रीटमध्ये रूपांतर करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याचे कौतूक करावे, तेवढेच कमी आहे. संध्यागवई, सरपंच, विवरा.