अकोला- शहरबस वाहतूक सेवेतील बसेस नादुरुस्त असल्याने अखेर महापालिकेला शहर बस वाहतूक सेवा बंद करावी लागली. दरम्यान, बससेवा कंत्राटी पद्धतीने चालवण्यासाठी बोलावलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाल्याने प्रशासनाने पुन्हा निविदा बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
अकोला शहर बस वाहतूक सहकारी संस्था आर्थिक अडचणीत आल्यानंतर संस्थेने महापािलकेला पाच कोटी रुपयांचे अनुदान मागितले. एवढे अनुदान महापालिकेला देणे शक्य नव्हते. बससेवा बंद होऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी महापािलकेने ही बससेवा स्वत: चालवण्यासाठी घेतली. मात्र, उपलब्ध बससेवा अत्यंत नादुरुस्त असल्याने ही बससेवा चालवणे प्रशासनाला अवघड झाले आहे. ही सेवा चालवण्यासाठी प्रशासनाने िवविध क्लृप्त्या लढवल्या. मात्र, बसेस मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाल्याने बसेस दुरुस्त करूनही फारसा फायदा झाला नाही. चालू बसेस कुठेही अचानक बंद पडण्याचे प्रकार वारंवार घडल्याने अखेर प्रशासनाला शहर बस वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या दरम्यान ही बससेवा कंत्राटी पद्धतीने चालवण्यासाठी प्रशासनाने निविदा बोलावल्या, परंतु या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही.
...तर कर्ज काढून मनपा बसेस घेणार
शहरबस वाहतूक सेवेबाबत पहिल्या निविदेला प्रतिसाद मिळाल्याने दुसऱ्यांदा निविदा बोलावल्या जाणार आहे. या निविदांमध्येही प्रतिसाद मिळाल्यास पुन्हा तिस-यांदा निविदा बोलावल्या जातील. परंतु, तिसऱ्यांदा प्रतिसाद मिळाल्यास कर्ज काढून वाहतूक सेवेसाठी बस खरेदी करण्याचा महापालिका प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे आता याबाबत निविदा प्राप्त झाल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.'' दयानंदिचंचोलीकर, उपायुक्त,अकोला महापालिका.