आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • City Construction Department, Latest News In Divya Marathi

शहरामधील निर्माणाधीन 135 बांधकामे थांबवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मनपा हद्दीत निर्माणाधीन अनधिकृत 135 बांधकामे थांबवण्याचा आदेश नगर रचना विभागाने दिला आहे. त्यामुळे येथील कंत्राटदारांच्या वतरुळात खळबळ उडाली असून, त्यांनी आता धावाधाव सुरू केली आहे. मनपाने भविष्यात शहरात अवैध बांधकामे होऊ नये, सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत निर्माणाधीन 135 अवैध बांधकामे थांबवण्यात आली आहेत.निवासी, व्यापारी संकुल, निवासी घरांची माहिती मनपाने गेल्या काही दिवसात गोळा केली. या माहितीची छाननी केल्यानंतर मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधकाम करणार्‍यांची नावे मनपाने निश्चित केली. अशी अनधिकृत निर्माणाधीन बांधकामे त्वरित थांबवावी, असा आदेश महापालिका नगर रचना विभागाने दिला आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी मनपाने धडक मोहीम राबवली. या मोहिमेत पूर्व व दक्षिण झोनमध्ये सर्वाधिक अनधिकृत बांधकामे प्रशासनाला आढळली. अशा अनधिकृत इमारती, घरे, दुकानांची खरेदी केल्यास ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची भीती असते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी मंजूर नकाशापेक्षा नियमबाहय़पणे अधिकचे बांधकाम केले त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिका हद्दीत मोठय़ा प्रमाणात निवासी व व्यापारी संकुलात वाहनतळाच्या जागेत बांधकाम होतात. वाहनतळाच्या जागेवर घर व दुकाने उभारणार्‍या व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.
मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधकाम केल्याने या 135 बांधकामांवर कारवाई केली. त्यांचे मोजमाप घेण्यात येईल व नंतर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अशा अनधिकृत बांधकामांची तपासणी करूनच व्यवहार करावा. प्लिंथ लेव्हलपर्यंत दिलेल्या परवानगीपेक्षा अधिकचे बांधकाम असल्याने ही कारवाई करण्यात येत आहे. संदीप गावंडे, सहायक नगर रचनाकार, मनपा.
मंजूर नकाशापेक्षा बांधकाम जास्तच
ग्राहकांनी ही काळजी घ्यावी : इमारत वापर परवान्याशिवाय पाणी, विजेसह इतर सोयी देता नाही. दिल्यास प्रशासन त्या खंडित करू शकते. अशा परवान्याशिवाय दुकान, घर खरेदी करू नये. पायापर्यंतच बांधकामांची परवानगी दिली जाते. बांधकाम पूर्णतेचे प्रमाणपत्र मनपा देते. यामध्ये काही बँका कर्ज देतात, ते अवैध ठरते. फ्लॅट खरेदी करताना क्षेत्रफळ मोजून घ्यावे. फ्लॅट खरेदीच्या वेळी त्यात नमूद व प्रत्यक्ष क्षेत्रफळाची पडताळणी, किती स्वेअर फुटाचे पैसे देत आहोत, व्यावसायिक किती फूट बांधकाम प्रत्यक्षात अधिक बांधकाम देत आहे, यावर ती इमारत अवैध असल्याचे स्पष्ट होते.