आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • City Police Residence Of Locations Bad Condition Issue At Akola, Divya Marathi

शहरातील पोलिसांच्या निवासस्थानांची दुरवस्था

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहराच्या मध्यभागी पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांना राहण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयामागे पोलिसांसाठी बांधलेल्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. या निवासस्थानांमध्ये सध्या मोकाट कुत्र्यांचे वास्तव्य आहे. या इमारतीची डागडुजी केल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवासस्थानांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याची ओरड पोलिसांकडून होत आहे.
पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांकरिता ही निवासस्थाने 2003 मध्ये बांधली होती. या ठिकाणी 18 ते 20 कुटुंब वास्तव्यास होते. मात्र, कालांतराने या निवासस्थानांची डागडुजी न केल्याने आज ही निवासस्थाने भग्नावस्थेत पडली आहेत. योग्य देखभाल, दुरुस्तीअभावी काही निवासस्थाने जीर्णावस्थेत आहेत. कमी भाडे आकारून शासनामार्फत अधिकारी, कर्मचार्‍यांना निवासस्थाने उपलब्ध केली जातात. प्रत्येक निवासस्थानामध्ये राहणारे कुटुंब आणि होणार्‍या कार्यक्रमांमुळे कधीकाळी या परिसरात चांगले वातावरण होते. आज मात्र या ठिकाणी शुकशुकाट असल्याचे चित्र आहे.
कोण आहे जबाबदार
या निवासस्थानांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. पोलिस कर्मचार्‍यांच्या डागडुजी, दुरुस्तीच्या मागणीकडे सा.बां.चे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.
प्रस्ताव आल्यास कारवाई
पोलिस प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केल्यास आम्हाला इमारतीच्या दुरुस्तीची कारवाई करता येईल.’’ - एस. एस. भगत, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला.
निवासस्थानांकडे लक्ष देतो
पोलिस कर्मचार्‍यांच्या दृष्टीने निवासस्थाने महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे या बाबीकडे लक्ष घालून पोलिसांना न्याय देण्याचा प्रय} करतो.’’ प्रमोद काळे, होम डीवायएसपी.