आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Civic Problem News In Marathi, Bad Condition Of Bone Yard, Divya Marathi

सिंधी कॅम्पमधील स्मशानभूमीची दुरवस्था

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून, याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रविवारी, 23 फेब्रुवारीला सिंधी कॅम्प भागातील स्मशानभूमीची पाहणी केली असता येथील समस्यांचे दर्शन झाले. ही स्मशानभूमी महापालिका क्षेत्राच्या हद्दीत येत असून, स्मशानभूमीच्या बांधकामासाठी व देखरेखीसाठी निधी उपलब्ध असतो. तरीसुद्धा स्मशानभूमीतील समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या स्मशानभूमीत सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. नातेवाइकांना बसण्यासाठी बेंच नाहीत. शिवाय टिनशेडमध्ये केरकचरा व घाण साचलेली दिसून आली. हा प्रकार नेहमीचाच असल्याचे उपस्थितांनी सांगितले. यामुळे अंत्यसंस्कार करण्यास अडथळा निर्माण होत असल्याचीही माहिती उपस्थितांनी दिली. येथील समस्या निवारणार्थ महापालिका प्रशासनासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
काम सुरू आहे
4स्मशानभूमी विकासाचे काम सुरू आहे. त्यामुळे साहित्य पडलेले दिसून येते. लवकरच स्मशानभूमीचे काम पूर्णत्वास जाऊन सुविधा उपलब्ध होईल.’’ हरीश आलिमचंदानी, नगरसेवक, अकोला
सिंधी कॅम्पमधील स्मशानभूमीची झालेली दुरवस्था.