आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्हिल लाइन्स भागात पोलिसांनी केली स्वच्छता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्वच्छभारत मिशन अभियान देशपातळीवर राबवण्यात येत आहे. त्या अभियानाच्या अंमलबजावणीचे आदेश जिल्हा पोलिस प्रशासनाकडून सर्व पोलिस ठाण्यांना प्राप्त झाले आहेत. त्याची अंमलबजावणी रविवारी प्रभारी ठाणेदार किशोर शेळके यांच्या नेतृत्वात सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या परिसरात करण्यात आली.

रविवारी सकाळी ते १० या वेळेत पोलिस कर्मचाऱ्यांनी ठाण्याचा परिसर आणि समोरील मुख्य रस्ता झाडूने स्वच्दत केला. या वेळी प्रभारी ठाणेदार किशोर शेळके यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेचे महत्त्व विशद केले. या शहर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक आनंद मगर, पोलिस उपनिरीक्षक एस. आर. मिश्रा, पप्पू ठाकूर, उत्तमराव शेरणे हवालदार महादेव सोळंके, एएसआय बापूराव चव्हाण हरिश्चंद्र दाते, पंजाबराव इंगळे, गणेश कवळकार यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची या वेळी उपस्थिती होती..