आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला - शहरातील अस्वच्छतेवरून 10 सप्टेंबरला नगरसेवक आणि महापालिका प्रभारी उपायुक्तांमध्ये शासकीय विश्रामगृहात वाद झाला. या वेळी मनपाच्या कारवर हातगाडी फेकण्यात आली. नगरसेवक अजय शर्मा, राजू मुलचंदानी, अनहत कुरेशी, अब्दुल मुनाफ यांनी प्रभारी उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांना विश्रामगृहामध्ये बोलावले. या ठिकाणी गुल्हाने आणि अजय शर्मा यांच्यात वाद झाला. तेथे नगरसेवक विजय अग्रवाल, ठाणेदार प्रकाश सावकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश मिश्रा पोहोचले. यावेळी नगरसेवकांची समजूत काढताना ठाणेदार सावरकरांच्या नाकीनऊ आले होते.
साफसफाईचे दिले निर्देश
अजय शर्मा यांच्या प्रभागातील साफसफाईचे काम प्रलंबित नाही. येथील अस्वच्छतेस कारणीभूत आरोग्य निरीक्षक सुरेश पुंड यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. वैयक्तिक द्वेषातून हा आरोप अजय शर्मा करत आहे. दोषी कर्मचार्यांवर कारवाई करू. चंद्रशेखर गुल्हाने, उपायुक्त, महापालिका.
पत्रांवर प्रशासनाचे उत्तर नाही
गणेशोत्सव सुरू असताना मनपा अधिकार्यांकडून साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाला पाठवलेल्या पत्रांचे उत्तर मिळाले नाही. साफसफाईसाठी फावडे, घमेले उपलब्ध होत नाही. या ठिकाणी 24 पैकी 12 सफाई कर्मचार्यांची उपस्थिती असते. याशिवाय आरोग्य निरीक्षक नाही, डीडीटी व फिनाइल प्रभागात नाही. अजय शर्मा, नगरसेवक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.