आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 सुरक्षा गार्ड ड्युटीवर, तरी नर्सला मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सवरेपचारमध्ये 13 सुरक्षा गार्ड ड्युटीवर असल्यानंतरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयातील परिचारिकेला रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याची घटना घडल्याने सवरेपचारची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
परिचारिकेला मारहाण करत असताना अतिदक्षता विभागातील सुरक्षा गार्ड अशोक पागृत हे कुठे होते, असा प्रश्न उपस्थित होतो. सवरेपचारच्या पोलिस चौकीत घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतरही पोलिस वेळेवर हजर झाले नाही.
नर्सेस फेडरेशनची निदर्शने: अधिष्ठाता कार्यालयासमोर शनिवारी परिचारिकांनी निदर्शन केली. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा अरुणा वाघमारे, सचिव अंजली मेटकर, परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या नलिनी देशमुख, मेट्रन दीपाली निरपगारे, विजया जुनघरे, सुनीता सावळे, किरण जानुनकर, छाया डोंगरे, ममता चोपडे, रेणू डोंगरे, स्वाती गावंडे आदी परिचारिकांनी या वेळी अधिष्ठातांसोबत चर्चा केली.
बंदोबस्त करणे गरजेचे
सवरेपचार रुग्णालयातील परिचारिकांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. याचा बंदोबस्त प्रशासनाने करावा. या घटनेने कोणत्याही परिचारिकेने घाबरून जाण्याची गरज नाही. संघटना खंबीरपणे पाठीशी आहे.’’ अरुणा वाघमारे, जिल्हाध्यक्षा, नर्सेस फेडरेशन
पोलिसांना दिली माहिती, योग्य कारवाई अपेक्षित
सवरेपचारमधील परिचारिकेला मारहाण झाल्याची सर्व माहिती पोलिसांना कळवण्यात आली आहे. याबाबत निश्चित योग्य ती कारवाई करण्यात येईल. सुरक्षेबाबत गंभीरपणे विचार करण्यात येत आहे. ’’ डॉ. अशोक राठोड, अधिष्ठाता.
प्रकरण चौकशीत
याप्रकरणी परिचारिका सुवर्णा साळवे यांनी सिटी कोतवाली पोलिसात तक्रार दिली. तक्रारीसोबत वैद्यकीय अधिष्ठाता यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करावा, असे पत्र जोडल्यामुळे फिर्यादीचे बयाण घेण्याचे बाकी आहे. शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला नसून, प्रकरण चौकशीत ठेवण्यात आले आहे. रविवारी फिर्यादीचे बयाण घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रत्येक वॉर्डात सुरक्षा रक्षक राहणार
यापुढे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासन काळजी घेणार असल्याची ग्वाही अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी परिचारिकांना दिली. प्रसंगावधान साधत रुग्णांना चांगली वागणूक द्यावी. प्रत्येक वॉर्डात सुरक्षा गार्ड असेल याची दक्षता घेण्यात येईल. तसेच रिक्त पदभरतीही लवकर करण्यात येईल.’’ डॉ. अशोक राठोड, अधिष्ठाता.